news
‘संविधानाची ७३ वी घटनादुरुस्ती आणि ग्रामपंचायतीचे अधिकार’; अमरावती जिल्ह्यातील निंभोरा गावात यशस्वी कार्यशाळा संपन्न!‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!

‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!

पिंपरी पालिकेच्या मुख्य इमारतीत अभिवादन सोहळा; राष्ट्र सेवेसाठी समर्पित राहण्याची सर्व उपस्थितांनी घेतली सत्यनिष्ठा शपथ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भावपूर्ण अभिवादन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दोन्ही महान नेत्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि पालिकेचे उप आयुक्त संदीप खोत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महापालिकेत जमलेल्या सर्व मान्यवरांनी, अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्राची एकता आणि अखंडता जपण्यासाठी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतली.
राष्ट्रीय एकता शपथ:
“आम्ही, सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करू आणि आमच्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाली आहे; तसेच आम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आमचे स्वतःचे योगदान देण्याचा देखील सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत.”
या अभिवादन सोहळ्यास महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!