news
‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!‘भारत-कोरिया व्यावसायिक संबंध अन् करिअरच्या संधी’; SBPIM मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे धडे!
Home पिंपरी चिंचवड ‘ज्ञानाला सीमांच्या पलीकडे नेण्याचा PCU चा संकल्प’; आंतरराष्ट्रीय सहकार्य दिनानिमित्त झांबिया शिक्षण विभागाचे अधिकारी सन्मानित!

‘ज्ञानाला सीमांच्या पलीकडे नेण्याचा PCU चा संकल्प’; आंतरराष्ट्रीय सहकार्य दिनानिमित्त झांबिया शिक्षण विभागाचे अधिकारी सन्मानित!

मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात उपसंचालक डेरिक चिसांगा व सहकाऱ्यांचा सत्कार; शैक्षणिक करारांची नवीन दिशा स्पष्ट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

झांबिया सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला (PCU) सदिच्छा भेट!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारत आणि झांबिया या दोन्ही देशांमधील उच्च शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे काळाची गरज आहे. भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी झांबियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (PCU) दिलेली सदिच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फलदायी ठरेल, असा विश्वास PCU चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते, वडगाव-मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (PCU) ‘आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य दिना’चे औचित्य साधून झांबिया सरकारच्या शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने विशेष भेट दिली.

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान भारत आणि झांबिया यांच्यात उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.  दोन्ही देशांतील शैक्षणिक संधींचा विस्तार करण्यासाठी आणि दीर्घकालीन संस्थात्मक सहकार्यासाठी भविष्यात अधिकृत सामंजस्य करार करण्यावर भर. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या अभ्यास दौऱ्यास व शैक्षणिक देवाणघेवाणीस प्रोत्साहन देणे. दोन्ही देशांतील संस्थांना संयुक्त संशोधन, नवनवीन प्रकल्प व नवसंशोधनासाठी नवीन दिशा उपलब्ध करून देणे.

या कार्यक्रमास झांबिया सरकारच्या ‘क्रेडिट्स अँड स्कॉलरशिप्स’चे उपसंचालक डेरिक चिसांगा, व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा, PCU चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे, केनिया येथील मार्केटिंग मॅनेजर निशा कोटक, आंतरराष्ट्रीय प्रवेश व्यवस्थापक रचना पहुजा, आणि डॉ. रामदास बिरादार उपस्थित होते.
या भेटीचे आयोजन PCU चे कुलपती तथा PCET चे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
“अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळतो, प्राध्यापकांना आपले ज्ञान सामायिक करता येते आणि ज्ञानाला सीमांच्या पलीकडे नेणारी जागतिक शैक्षणिक व्यवस्था घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ सदैव कटिबद्ध आहे.”
— डॉ. संतोष सोनवणे (कुलगुरू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!