news
‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!

‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!

पिंपरी-चिंचवडमधून मारुती भापकर व काशिनाथ नखाते रांजणीत दाखल; कामे बंद ठेवून सर्व गावांत जनसुनावणी घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उजनी प्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!

पिंपरी-चिंचवड / रांजणी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: उजनी प्रकल्प परिसरातील शेती, समृद्ध पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी व कष्टकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पांविरोधात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी (जि. सोलापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील जन चळवळीच्या वतीने माजी नगरसेवक मारुती भापकर आणि ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दर्शविला.
आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात हे भव्य रस्ता रोको आंदोलन पार पडले. या प्रसंगी अहिल्यानगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, शेतकरी, मच्छीमार, मजूर आणि कामगार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनात आपली भूमिका मांडताना जन चळवळीचे नेते मारुती भापकर म्हणाले की, “उजनी धरण क्षेत्रामध्ये एआय (AI) डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन आणि अणुऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या विनाशकारी प्रकल्पांमुळे उजनीवर अवलंबून असणारे अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकरी, मच्छीमार, आदिवासी कातकरी समाज आणि शेतमजूर यांचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.”
अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर प्रस्तावित उद्योगांमुळे उजनीच्या जलसंपत्तीवर, शेतीवर आणि पर्यावरणावर नेमका काय विपरीत परिणाम होणार, याचा शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली कष्टकऱ्यांची शेती आणि रोजगाराचा बळी दिला जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळी १० वाजता सुरू झालेले हे तीव्र रस्ता रोको आंदोलन तब्बल ५ तास चालले. दुवारी ३ च्या सुमारास उजनी धरण प्रकल्प अधिकारी तसेच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
प्रस्तावित प्रकल्पांच्या संदर्भात अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित गावागावांमध्ये ‘जन सुनावणी’ घेण्यात येईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचे सर्व काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, असे अधिकृत आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!