news
‘संविधानाची ७३ वी घटनादुरुस्ती आणि ग्रामपंचायतीचे अधिकार’; अमरावती जिल्ह्यातील निंभोरा गावात यशस्वी कार्यशाळा संपन्न!‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!

‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!

महापौर कक्षात महत्त्वाची बैठक संपन्न; हजारो मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सणापूर्वी वेतन व सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळीपूर्वी बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ब्लॅकलिस्ट करणार; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांचा इशारा!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या हजारो कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी बोनस आणि वेतन अदा करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अत्यंत कडक व ठोस पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी कामगारांना हक्काचा बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कामगार कायद्यातील कडक तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असून, अशा बेजबाबदार ठेकेदारांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत टाकण्याचा) करण्याचा इशारा महापालिकेचे मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिला आहे.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांची विशेष भेट घेऊन कंत्राटी व मानधन कामगारांच्या थकीत वेतन, सानुग्रह अनुदान आणि दिवाळी बोनसच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. कामगारांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी त्यांना सणापूर्वी बोनस मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी आवर्जून निदर्शनास आणून दिले.
या बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर रवी लांडगे यांनी मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना बैठकीला तात्काळ उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. महापौरांनी कामगारांच्या मागण्यांवर अत्यंत सकारात्मक भूमिका घेत सर्व ठेकेदारांना सक्तीचे परिपत्रक काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
बैठकीनंतर माहिती देताना मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी सांगितले की, “कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस व थकीत वेतन अदा करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक जास्तीत जास्त सोमवारी सकाळपर्यंत जारी करण्यात येईल. महापालिकेच्या सर्व विभागांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या ठेकेदारांना या परिपत्रकाद्वारे कडक सूचना दिल्या जातील.”
कामावर असणाऱ्या प्रत्येक कामगाराला वेळेत बोनस व पूर्ण वेतन मिळालेच पाहिजे, यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. ज्या ठेकेदारांकडून या नियमांचे आणि आदेशांचे उल्लंघन केले जाईल, त्यांच्यावर कामगार कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा ठेकेदारांना पालिकेतून काळ्या यादीत टाकण्यासोबतच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच कंत्राटी कामगारांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही लवकरच महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!