news
‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘भारत-कोरिया व्यावसायिक संबंध अन् करिअरच्या संधी’; SBPIM मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे धडे!

‘भारत-कोरिया व्यावसायिक संबंध अन् करिअरच्या संधी’; SBPIM मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे धडे!

संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न; PCET च्या विश्वस्त मंडळाचे विशेष मार्गदर्शन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे ‘कोरिया व्यवसाय आणि संस्कृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे ‘इंडिया कोरिया एज्युकेशन अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस’ (IKETS), ‘कोरिया एसएमई अँड स्टार्ट अप्स एजन्सी’ (KOSME) आणि ‘स्टारजिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोरिया व्यवसाय आणि संस्कृती’ विषयावर विशेष ऑफलाइन व ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जागतिक बाजारपेठेतील बदलत्या संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक शिष्टाचार समजून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उद्बोधक ठरली.
कार्यशाळेत कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सीचे (KOSME) संचालक सेउंग जंग कांग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात त्यांनी कोरियन व्यावसायिक पद्धती, कॉर्पोरेट संस्कृती, उद्योजकता, नावीन्यपूर्ण प्रयोग (Innovation) आणि आंतर-सांस्कृतिक दृष्टिकोन यांवर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच कोरियाची गतिमान व्यावसायिक परिसंस्था, जागतिक बाजारपेठेतील संधी, व्यावसायिक शिष्टाचार, प्रभावी संवाद, परस्पर सहकार्य आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय संबंध कसे प्रस्थापित करावेत, याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला.

या प्रसंगी SBPIM च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि एमबीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!