news
‘प्रास्ताविका हे देशाचा आत्मा; बेकायदेशीर कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागणार’; नरेंद्र बनसोडे आक्रमक!‘गीतगायन, मराठी म्हणी अन् सण-उत्सवाचा आनंद’; सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!‘सत्तेच्या जोरावर पर्यावरणाचा ऱ्हास आणि कष्टकऱ्यांचा विनाश खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले!‘अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आजच्या काळात सुसंगतता’; पिंपरी पालिकेत ‘सरदार प्रबोधन पर्व’ उत्साहात सुरू!‘दुष्काळमुक्तीच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे’; सांगोल्यातील आमरण उपोषणाला मराठवाडा जनविकास संघाचा पाठिंबा!
Home पिंपरी चिंचवड ‘अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आजच्या काळात सुसंगतता’; पिंपरी पालिकेत ‘सरदार प्रबोधन पर्व’ उत्साहात सुरू!

‘अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आजच्या काळात सुसंगतता’; पिंपरी पालिकेत ‘सरदार प्रबोधन पर्व’ उत्साहात सुरू!

महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; 'अपरिचित सरदार गाथा' संगीतमय कार्यक्रमास रसिकांची दाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिन’ उत्साहात साजरा!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलादी पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’ ला शहरात अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात सुरुवात झाली आहे. या पर्वांतर्गत एकता दौड, विशेष व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या ‘एकता दौड’ (Run for Unity) ने झाली. भक्ती-शक्ती चौक येथून सुरू झालेली ही दौड निगडी उड्डाणपूल – काचघर – भेल चौक या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत पुन्हा भक्ती-शक्ती चौक येथे संपन्न झाली.
दौड सुरू करण्यापूर्वी उपस्थितांनी “भारत माता की जय” च्या गगनभेदी घोषणा देत संपूर्ण परिसर देशभक्तीच्या नादात दुमदुमून सोडला. यावेळी सर्व मान्यवरांनी आणि नागरिकांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा वाचन करवाले:
राष्ट्रीय एकता शपथ
“आम्ही, सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करू आणि आमच्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाली आहे. तसेच आम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आमचे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत.”

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकता आणि अखंड भारताच्या निर्मितीतील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित या उपक्रमात शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांनी व शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी कैलास कुटे (सभापती, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती), नामदेव डाके (माजी नगरसदस्य), पंकज पाटील (उप आयुक्त), बापू गायकवाड (सह शहर अभियंता), प्रफुल्ल पुराणिक (जनता संपर्क अधिकारी)
यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दिनाचे औचित्य साधून निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विविध सांस्कृतिक व प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर नामवंत वक्ते प्रा. महिपतराव ठाकूर यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले. त्यांनी उपस्थितांसमोर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे, राजकीय कौशल्याचे आणि राष्ट्रनिर्मितीच्या अथांग कार्याचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विशद केले.  व्याख्यानानंतर ‘अपरिचित सरदार गाथा’ हा विशेष संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात देशक्तीपर गीते आणि संवादाच्या माध्यमातून सरदार साहेबांच्या जीवनातील अनोख्या पैलूंचे दर्शन घडवण्यात आले, ज्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

 

महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली मनपाच्या क्रीडा विभागामार्फत या संपूर्ण भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!