news
‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!‘एआय, सायबर सुरक्षा आणि डेटा सेंटर सेवांमध्ये फिडेलची जागतिक भरारी’; सॉफ्टेंजरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू!
Home पिंपरी चिंचवड ‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!

‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!

तेजस्विनी भोसले द्वितीय तर खुशल पाटील तृतीय क्रमांकाचे विजेते; शहरभरातील शेकडो गणेशभक्तांची व मान्यवरांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राहुल कलाटे फाउंडेशनच्या १२ व्या ‘श्री गणेशोत्सव फोटो कॉन्टेस्ट २०२६’ चा पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: एकत्र कुटुंब, कल्पक सजावट आणि घराघरांत सजलेला बाप्पाचा मंगलमय दरबार अशा विविधांगी संकल्पनांतून साकारलेल्या देखाव्यांचा गौरव करत राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘श्री गणेशोत्सव फोटो कॉन्टेस्ट स्पर्धा २०२६’ (घरचा गणपती) चा भव्य पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व थाटात पार पडला.
स्पर्धेचे हे १२ वे वर्ष होते. घरातील प्रत्येकाने एकत्र येऊन साकारलेली सुंदर सजावट, आकर्षक देखावे, लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येकाच्या कल्पकतेतून सजलेला बाप्पाचा मंगलमय दरबार या सगळ्यांतून घरच्या गणेशोत्सवाचे खरे कौटुंबिक सौंदर्य यंदाच्या स्पर्धेत अनुभवायला मिळाले.

कुटुंबातील एकोपा, सर्जनशीलता आणि गणरायाप्रती असलेली अपार श्रद्धा यांचा सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने या ‘श्री गणेशोत्सव फोटो कॉन्टेस्ट’चे अत्यंत नेटके आयोजन केले जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ व प्रोत्साहन देतानाच, आपल्या संस्कृतीतील कौटुंबिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जपण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न राहुल कलाटे करत आहेत. क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने राबविल्या जाणाऱ्या अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडत असून, पिंपरी-चिंचवडकर नागरिकांमध्ये आणि विशेषतः गणेशभक्तांमध्ये त्यांची प्रतिमा एक अत्यंत लोकाभिमुख, अभ्यासू आणि सांस्कृतिक मूल्ये जपणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून अधिक उजळून निघाली आहे.

यंदाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास शहर व जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची व लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. श्री. शंकरजी मांडेकर (आमदार), श्री. अमितजी गोरखे (आमदार), सौ. उमाताई खापरे (आमदार), श्रीमती अश्विनीताई जगताप (माजी आमदार), श्री. शत्रुघ्न काटे (शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, पिंपरी-चिंचवड), श्री. प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते), श्री. कुणाल वाव्हळकर (नगरसेवक), सौ. रेश्मा भुजबळ (नगरसेविका), श्री. मधुकर बच्चे (शहर सरचिटणीस), श्री. मोरेश्वर शेडगे (शहर सरचिटणीस) उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विजेत्यांना ढाल, प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
‘घरचा गणपती’ विभागातील अधिकृत विजेते-
प्रथम क्रमांक: रूपा वाणी – (काटे पुरम, सांगवी),  द्वितीय क्रमांक: तेजस्विनी राजाराम भोसले – (चिंचवड),  तृतीय क्रमांक: खुशल पाटील – (ताथवडे)
 उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते-
विपुल घोलप – रावेत, धीरज सावलानी – वाकड, प्रणव शंकर बोराटे – पिंपळे सौदागर, संतोष देशपांडे – वाकड, रोहित बोंगले – पिंपळे गुरव, दिनेश मोहिते – वाकड, दिपाली तानाजी उफाळे – चिंचवड, श्वेता मनोज किनगे – रावेत, विवेक जाधव – वाकड, अभिषेक उल्हास जावळेकर – पिंपळे गुरव, सचिन सुभाष आंबोळे – रहाटणी, दिनेश किनगे – पुनावळे, भूषण प्रकाश पाटील – वाकड, प्रियंका चेतन झांबरे – पिंपळे सौदागर, दर्शिल पियुष राव – चिंचवड

 

राहुल कलाटे फाउंडेशन व सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व यशस्वी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कलात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!