news
‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!‘एआय, सायबर सुरक्षा आणि डेटा सेंटर सेवांमध्ये फिडेलची जागतिक भरारी’; सॉफ्टेंजरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू!
Home पिंपरी चिंचवड ‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!

‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!

'दुष्काळ निवारण व निर्मूलन समिती'चा राज्य शासनाला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पशुपालक व मच्छीमारांना तातडीने अर्थसहाय्य करा!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे व दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, या मागणीसाठी ‘दुष्काळ निवारण व निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड’ तर्फे शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने तहसीलदार जयराज देशमुख यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार नेते काशिनाथ नखाते, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, प्रदीप पवार, इरफान चौधरी, सहदेव होनमने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार, स्थानिक कारागीर समूह, महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत वितरित करण्यात यावी.  दुष्काळग्रस्त सर्व गावे, वाड्या आणि वस्त्यांवर नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे.  जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेऊन त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना गावांतच रोजगार निर्माण करून दिला जावा. दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण खंडित न होता सुरळीत सुरू राहण्यासाठी या वर्षी तसेच पुढील वर्षी विशेष शैक्षणिक आर्थिक मदत दिली जावी. दुष्काळग्रस्त भागात ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी योजने’अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामांची उपलब्धता करून दिली जावी. पशुधनाच्या संरक्षणासाठी मोफत चारा, पाणी, मोफत पशुवैद्यकीय सेवा आणि गरजेनुसार तात्काळ चारा डेपो व चारा छावण्या उभारण्यात याव्यात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (PDS) माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १० किलो मोफत धान्य उपलब्ध करून दिले जावे.

 

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील बळीराजा आणि कष्टकरी जनता अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून, राज्य शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी उपस्थित नेत्यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!