19

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक ऍक्रोबॅटिक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा डंका!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: निगडी येथील इलाईट जिम्नॅस्टिक सेंटर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक ऍक्रोबॅटिक स्पर्धेमध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १९ वर्षांखालील गटात विविध क्रीडा प्रकारांत अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या चुरशीच्या स्पर्धेत मुलींच्या जोडी प्रकारात कृष्णल खंडागळे (इयत्ता ६ वी) व सावनी बडवे (इयत्ता ७ वी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच मिश्र जोडी (मिक्स्ड पेअर) प्रकारात ओम पाटील (इयत्ता १० वी) व ओवी निकम (इयत्ता ९ वी) यांनी चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेत मुलांच्या गटात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी प्रभावी सादरीकरण केले. विश्वतेज डेरे (इयत्ता ७ वी), आयुष मगर (इयत्ता ६ वी), वेदांत देशपांडे (इयत्ता ९ वी) आणि अक्षत वारके (इयत्ता ९ वी) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक संपादन केला. रुद्र जंगीरवाड (इयत्ता ९ वी) व अमित कोडगोनोरा (इयत्ता ९ वी) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा आणि क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

