news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मावळमहाराष्ट्र निळ्या पूररेषेतील पुनर्विकासाला चालना! राज्यमंत्र्यांचे सकारात्मक संकेत!

निळ्या पूररेषेतील पुनर्विकासाला चालना! राज्यमंत्र्यांचे सकारात्मक संकेत!

आमदार जगताप यांच्या प्रयत्नांना यश; पिंपरी-चिंचवडसाठी धोरणात्मक निर्णयाची शक्यता!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुंबई (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पूररेषेतील पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे संकेत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या विषयाला चालना मिळाली आहे.

बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत, निळ्या पूररेषेतील बाधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाबाबत आणि अधिकृत इमारतींना पूर्ण क्षमतेने टीडीआर (TDR) देण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भूषवले.

आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, आमदार जगताप यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे या विषयावर तातडीने बैठक घेण्यात आली.

या बैठकीत, पूररेषेतील परिस्थितीचे सर्वेक्षण करून नदीचे बाइंडिंग करणे, निळ्या पूररेषेची फेरआखणी करणे आणि त्या आधारे धोरणात्मक पद्धतीने पुनर्विकासाला दिशा देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच, अधिकृत बांधकामांना पूर्ण क्षमतेने वाढीव टीडीआर देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

निर्णयांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना शहरातील निळ्या पूररेषा बाधित अधिकृत इमारतींबाबत सविस्तर प्रस्ताव आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सध्या पूररेषेत सुरू असलेल्या बांधकामांना दिलेल्या परवानग्यांवर तात्पुरती स्थगिती देऊन मार्गदर्शक सूचना मागवण्याचे आदेशही देण्यात आले.

या बैठकीला महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर, नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ADTP संजय खडतरे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!