Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या ‘एसआरए’ प्रकल्पावरून वाद पेटला: निगडी सेक्टर २२ मध्ये ‘दुबार पुनर्वसना’चा आरोप!

पिंपरी-चिंचवडच्या ‘एसआरए’ प्रकल्पावरून वाद पेटला: निगडी सेक्टर २२ मध्ये ‘दुबार पुनर्वसना’चा आरोप!

१५६३ बैठी घरे असलेल्या प्रकल्पाविरोधात 'कृती समिती'ची भक्कम बाजू; रहिवाशांचा तीव्र विरोध, पुढील निर्णयाकडे लक्ष. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संजय नगर, निगडी सेक्टर २२ च्या ‘एसआरए’ प्रकल्पाविरोधात सुनावणी संपन्न: दुबार पुनर्वसनावर आक्षेप कायम!

 

 

‘कृती समिती’ने पुराव्यानिशी बाजू मांडली; ‘बिल्डर लॉबी’साठी चुकीच्या पद्धतीने प्रकल्प लादल्याचा आरोप; रहिवाशांचा तीव्र विरोध!

 

पिंपरी-चिंचवड, दि. १ जुलै २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सेक्टर क्र. २२, निगडी, संजयनगर येथील प्रस्तावित ‘एसआरए’ (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाबाबत आज (सोमवार, ३० जून २०२५) एसआरए पुणे यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण सुनावणी घेण्यात आली. १५६३ बैठी घरे असलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाबाबत सेक्टर क्र. २२ कृती समितीने दाखल केलेल्या हरकतींवर ही सुनावणी झाली.


 

‘दुबार पुनर्वसन’ आणि ‘बिल्डर लॉबी’च्या फायद्याचा आरोप!

 

सदर सुनावणीमध्ये माननीय सीईओ – गटने साहेब व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच कृती समितीचे पदाधिकारी आणि संजयनगरमधील हरकतधारक रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये हरकतींवर चर्चा झाली. कृती समितीची बाजू ॲडव्होकेट संतोष शिंदे यांच्या वतीने सर्व पुराव्यानिशी भक्कमपणे मांडण्यात आली.

कृती समितीने आरोप केला की, निगडी सेक्टर क्र. २२ मधील १५६३ बैठी घरांचे १ मे १९८९ रोजी मनपातर्फे मूळातच पुनर्वसन झाले असताना देखील, बिल्डर लॉबीच्या फायद्याकरिता खोटी ‘३क’ ऑर्डर (खोटा आदेश) आणि खोटे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच, लोकांना चुकीची माहिती देऊन, दिशाभूल करून त्यांच्याकडून ‘लाभार्थी फॉर्म’ भरून घेतले गेले आणि अनधिकृत ‘दुबार पुनर्वसन’ प्रकल्प मंजूर करून घेतला.

आजच्या सुनावणीमध्ये दुबार पुनर्वसना विरोधात ॲड. संतोष शिंदे यांनी कृती समितीची बाजू पुन्हा एकदा पुराव्याणीशी मांडली. दुबार पुनर्वसनास केवळ कृती समितीचाच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचा आणि लाभार्थी म्हणून ज्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांचा देखील तीव्र विरोध असल्याचे एसआरए सुनावणी समितीस स्पष्टपणे सांगण्यात आले.


 

मोठ्या संख्येने रहिवाशांची उपस्थिती

 

या सुनावणी प्रसंगी संजयनगरमधील रहिवाशी आणि कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रशांत नाटेकर, शिवाजी साळवे, ॲड. संतोष शिंदे, सुलतान तांबोळी, बसवराज नाटेकर, प्रमोद क्षीरसागर, अक्षय करांडे, सचिन उदागे, रमेश शिंदे, सुधाकर म्हस्के, अरुण जोगदंड, सनमुख हादिमणी, रवी पाटोळे, विकास गालफाडे, जावळे, शुभम शिंदे, बुद्धभूषण अहिरे व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या सुनावणीमुळे संजयनगरच्या पुनर्वसन प्रकल्पावरून सुरू असलेला वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिक आपल्या हक्कांसाठी लढण्यास कटिबद्ध असल्याचे दिसून आले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment