news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये जेष्ठांचा ‘आनंदोत्सव’: वाकडच्या ‘आनंद जेष्ठ नागरिक संघा’ची वार्षिक सभा संपन्न!

पिंपरी-चिंचवडमध्ये जेष्ठांचा ‘आनंदोत्सव’: वाकडच्या ‘आनंद जेष्ठ नागरिक संघा’ची वार्षिक सभा संपन्न!

८ सदस्यांपासून ५०० पर्यंतचा टप्पा; मयूर कलाटेंनी सांगितले 'अतूट नाते', निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वाकडच्या ‘आनंद जेष्ठ नागरिक संघा’ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!

 

 

मयूरभाऊ कलाटेंकडून संघाच्या ‘वटवृक्ष’ वाढीचे कौतुक; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, गुणवंतांचा सन्मान!

 

वाकड, पिंपरी-चिंचवड, दि. १ जुलै २०२५: पोस्टल कॉलनी, वाकड येथील आनंद जेष्ठ नागरिक संघाची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (सोमवार, २९ जून २०२५) बर्ड व्हॅली, वाकड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या सभेत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.


अधिवेशनाची सुरुवात आणि मान्यवरांची उपस्थिती

 

पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मागील महिन्यात निधन झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मयूरभाऊ कलाटे, माजी नगरसेविका सौ. स्वातीताई कलाटे (पिंपरी-चिंचवड), आणि जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा मा. वृषाली मरळ उपस्थित होत्या, तर आनंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. भागवत कोल्हे यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

या प्रसंगी प्रथम सरस्वती पूजन श्री. मयूरभाऊ कलाटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सौ. स्वाती कलाटे, मा. स्वाती मरळ, आनंद संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे, उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव श्री. सुरेश बोरकर, कोषाध्यक्ष माधव बह्राटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


 

सांस्कृतिक कला मंचाचे सादरीकरण आणि विविध सत्कार

 

संघात नव्याने स्थापन झालेल्या सांस्कृतिक कला मंचतील कलाकार प्रतिभा गवळे, पुष्पा ढवळे, विभा दरेकर, सुनील जोशी, माधव बह्राटे, हर्षाली देसाई, हेमांगी बोंडे, विनया सरदेसाई, संगीता साठे, सुनीता सफई इत्यादींनी गणेश वंदना, शारदा स्तवन, स्वागत गीत आणि समूह गीत सादर करून सभेला सांस्कृतिक किनार दिली.

त्यानंतर उपस्थित मान्यवर माजी नगरसेवक मयूर कलाटे, माजी नगरसेविका सौ. स्वाती कलाटे, श्रीमती स्वाती मरळ, दीप्ती रहटे, विष्णू तांदळे, मुकुंद दमकले, सारिका अटेकर यांचा संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री. भागवत कोल्हे, श्री. मुरलीधर लहाने, श्री. सुरेश बोरकर, श्रीमती स्वाती मरळ यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार समारंभ पार पडला.

माजी नगरसेविका सौ. स्वाती कलाटे यांनी संघ हा जेष्ठांसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले, तर श्रीमती मरळ यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. मा. कोल्हे यांनी संघाच्या कार्याची महती सांगणारी श्रीमती विजया चौधरी यांची कविता वाचून दाखवली.

पत्रकार बाबू डिसुझा, अहवाल पुस्तिका तयार करणारे अविनाश रानडे यांच्यासह ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासद किशोर भावे, सुहास राव, राजाराम डिके, कामराज पाटील, सावित्रीदेवी विश्वकर्मा, विनया मुजुमदार, शकुंतला पवार आदींचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत डिके यांनी मनोगत व्यक्त केले.


 

विशेष सत्कार आणि आर्थिक अहवाल

 

या सभेत काही विशेष सत्कारही करण्यात आले. नवविवाहित जेष्ठ दाम्पत्य श्री. मुरलीधर लहाने व सौ. आसावरी लहाने यांचा, तसेच आयुष संस्थेची योग परीक्षा उत्तीर्ण होऊन योग शिक्षिका पदवी प्राप्त केलेल्या सौ. रेखा गिरमे यांचा, आणि संघासाठी सर्वोच्च निधी संकलन केलेल्या श्री. प्रवीण कुलकर्णी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात श्री. बोरकर यांनी मागील वर्षाच्या बैठकीविषयी माहिती दिली, तर श्री. मुरलीधर लहाने यांनी अहवाल वाचन केले. जमा-खर्च, ताळेबंद, अंदाजपत्रक इत्यादी आर्थिक बाबींची माहिती कोषाध्यक्ष माधव बह्राटे यांनी दिली.


 

‘आनंद जेष्ठ नागरिक संघ’: एक वटवृक्ष – मयूर कलाटे

 

माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी आपल्या भाषणात आनंद जेष्ठ नागरिक संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आनंद जेष्ठ नागरिक संघ हा वाकडमधील एकमेव उपक्रमशील कार्यक्रम घेणारा संघ असून, हा संघ सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेतो.” आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला आज एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण होत असून, सुरुवातीच्या कार्यकाळात ८ ज्येष्ठ नागरिकांनी मिळून लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे, आणि हा वटवृक्ष भविष्यात असाच बहरलेला असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कलाटे पुढे म्हणाले, “८ ज्येष्ठ नागरिकांनी मिळून सुरू झालेला संघ आज ५०० सदस्य पर्यंत पोहोचलेला पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील सर्वात मोठा संघ असून, मी राजकीय क्षेत्रात काम करत असल्यापासून या संघाचे नेहमीच मला पाठबळ लाभलेले आहे. माझ्या राजकीय सुरुवातीच्या काळापासून माझे आणि या संघाचे अतूट नाते व जिव्हाळा निर्माण झालेला आहे, तो आजही भक्कम आहे आणि यापुढील काळात कायम मी त्यांच्या पाठीशी आहे, ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहोत.” शेवटी त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उर्वरित आयुष्य निरोगी व उत्तम राहो अशा शुभेच्छा दिल्या.

सभेच्या शेवटी पसायदान होऊन त्यानंतर रुचकर भोजन घेऊन सभेची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजया चौधरी यांनी केले. ही माहिती आनंद जेष्ठ नागरिक संघाच्या प्रसिद्धी विभागाची धुरा सांभाळणारे श्री. अशोक बोंडे आणि सौ. हेमांगी बोंडे यांनी कळवली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!