पिंपरी-चिंचवड मनपा सेवेतून ६१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त: सह आयुक्त मनोज लोणकरांकडून सत्कार आणि शुभेच्छा!
‘कार्यकाळात जपले सौजन्यपूर्ण संबंध, कामकाजावर निष्ठा’: निरोगी व आनंदी आयुष्यासाठी सेवानिवृत्तांना मार्गदर्शन!
पिंपरी, दि. १ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे जून २०२५ अखेर ६१ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे ५१ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
‘सेवेप्रती समर्पण आणि सौजन्यपूर्ण संबंध’: सह आयुक्त मनोज लोणकर
यावेळी मार्गदर्शन करताना सह आयुक्त मनोज लोणकर म्हणाले की, “महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात त्यांना सोपविलेली कामे व कर्तव्ये जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. त्यांनी सहकाऱ्यांशी सौजन्य आणि सहकार्याने अनेक वर्षे सेवा केली आहे.” सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे, तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. लोणकर यांनी सर्व सेवानिवृत्तांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभास मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे, महादेव बोत्रे, नथा माथेरे, मंगेश कलापुरे तसेच महापालिका कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी:
माहे जून २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे कर्मचारी:
- अधिकारी: सहशहर अभियंता नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सहाय्यक आयुक्त नाना मोरे, मुख्याध्यापक वैशाली तवटे, हमीदा मोमीन, संभाजी बामणे, असिस्टंट मेट्रन किरण गायकवाड.
- कर्मचारी (कार्यालयीन व इतर): कार्यालय अधिक्षक प्रमोद सावरकर, आनंदा सातपुते, ढवळू मुंढे, लेखापाल राजश्री नेवासकर, मुख्य लिपिक विजय जाधव, प्रमोद निकम, सिस्टर इन्चार्ज मिनहाज सय्यद, विजया रोडे, नंदा गायकवाड, उपशिक्षक श्रद्धा जोशी, अरूणा नलवडे, उज्ज्वला मरळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भिमराव चौधरी, वैजनाथ पांढरे, फिटर लक्ष्मण वायदंडे, वायरमन यशवंत जगताप, वायरलेस ऑपरेटर भगवान कांबळे, ऑपरेटर गोरखनाथ जराड, वॉर्ड बॉय सखाराम मोरे, रखवालदार अर्जुनन गणेशन, सुभाष साळुंके, पंढरीनाथ चौरे, शिपाई मोहन बहिरट, मजूर सुरेश बोडके, अशोक सातपुते, शिवाजी कुसाळकर, राजेंद्र ढोरे, पंढरीनाथ बारणे, मधुकर ठोंबरे, जयंत वाघेरे, दत्तात्रय मिसाळ, बाजीराव मासुळकर, मुकादम उत्तम गवळी, एकनाथ शेळकंदे, नाईक राजू बोरकर.
- सफाई कामगार: राजकुमार जाधव, मंदा भुजबळ, विनोद सपकाळ, मेघनाथ सारसर, कचरा कुली अरूण लोंढे, गटरकुली मोहन मंजाळ, बाळू गायकवाड, भाऊसाहेब रोकडे, करिम शेख.
स्वेच्छानिवृत्ती घेणारे कर्मचारी:
- सफाई सेवक उत्तम त्रिभुवन, माया वाल्मिकी, संदिप लांडगे, शिरीष गायकवाड, कचरा कुली कैलास जगताप, अंबादास जाधव, गटरकुली मंजाळ शेट्टी, अनिल विटकर, वसंत चव्हाण, कचरा कुली बबन सांगळे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
