Home पिंपरी चिंचवड शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिवादन

शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिवादन

सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

by maxmanthannews@gmail.com
0 comments

सोलापूर (मॅक्स मंथन डेली न्यूज): शूरवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिवादन

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील जुना पुणे नाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “इतिहास हा भविष्याचा आरसा असतो. या आरशाकडे आपण जशा नजरेने पाहतो, तशीच आपली प्रतिमा दिसते. छत्रपती संभाजी महाराजांसारखे इतिहास पुरुष युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य उभे केले, ते सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारे आहे. त्यांचे जीवन आणि मृत्यू आजही पराक्रमाची प्रेरणा देतात. मात्र आज त्यांना फक्त ढाल, तलवार आणि धर्माच्या चौकटीत बंद केलेले दिसते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ही चौकट मोडून, ढाल-तलवारीच्या पलीकडचे छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

कार्यक्रमात पक्षाचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, ज्ञानेश्वर सपाटे, महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने, रेखा सपाटे, लता ढेरे, उमा केत, शहर उपाध्यक्ष विजय भोईटे, ओबीसी सेल अध्यक्ष बिरप्पा बंडगर, सोपान खांडेकर, शहर सरचिटणीस सूर्यकांत शिवशरण, ज्ञानेश्वर सोनवणे, संदीप साळुंखे, रामप्रसाद शागालोलू, सुरेश कुंभार, सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात वक्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि त्यांच्यातील विविध गुणांचे वर्णन केले. तसेच, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजात चांगले कार्य करण्याचा संदेश दिला.

You may also like

Leave a Comment