news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड आमदार शंकर जगताप यांचा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप! उद्यानातील असुविधांवरून चांगलेच फैलावर घेतले!

आमदार शंकर जगताप यांचा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप! उद्यानातील असुविधांवरून चांगलेच फैलावर घेतले!

तुटलेले झोके, सुकलेली झाडे, मद्यपींचा वावर; आमदार जगताप संतप्त!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी, ११ मे २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): सांगवी परिसरातील उद्यानांची दुर्दशा पाहून आमदार शंकर जगताप चांगलेच संतप्त झाले. त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी उद्यानाला भेट दिली. या भेटीदरम्यान उद्यानांमधील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे आणि परिसरात मद्यपींचा वावर पाहून आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, सारिका भंडलकर, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, गणेश सहकारी बँक संचालक प्रमोद ठाकर, हेमंत निगुडकर, महानगर बँक संचालक नितीन खोडदे, शारूख सय्यद, अमोल गायकवाड, वैभव ढोरे, विशाल सोमवंशी, प्रदीप झांजुर्णे, अमित गवळी, योगेश मोहारे, विनायक शिंदे, सुजित पोंगडे, गणेश ढोरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

उद्यान विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. ते म्हणाले, “आता शाळांना सुट्ट्या आहेत आणि मोठ्या संख्येने लहान मुले उद्यानात खेळायला येतात. मुलांना सुरक्षितपणे खेळता यावे यासाठी तातडीने खेळण्यांची दुरुस्ती करा. जे खेळणे नादुरुस्त आणि धोकादायक आहे, ते त्वरित काढून टाका. उद्यानातील झाडे आणि हिरवळ पाण्याअभावी सुकणार नाही याची काळजी घ्या. तसेच, तातडीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून उद्यान परिसरात मद्यपींचा बंदोबस्त करा,” अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहून उपस्थित पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नागरिकही आश्चर्यचकित झाले. आता तरी उद्यान विभाग आपल्या कामात सुधारणा करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तुमच्या परिसरातील उद्यानांची काय स्थिती आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!