news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home पिंपरी चिंचवड ब्राह्मणवादी लेखकांनी इतिहासाची रचना बदलली – अभिनेते किरण माने यांचा परखड विचार!

ब्राह्मणवादी लेखकांनी इतिहासाची रचना बदलली – अभिनेते किरण माने यांचा परखड विचार!

'शिवराय ते भीमराय': संविधानाने प्रत्यक्षात आणले शिवरायांचे विचार - किरण माने.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): ‘संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात आणले!’ असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केले. चिंचवड येथे जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर दुसरे व्याख्यान देताना ते बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, संदीपान गायकवाड, शिवलिंग ढवळेश्वर, प्रताप गुरव, अनिल सूर्यवंशी, गणेश लंगोटे आणि मुख्य संयोजक मारुती भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मारुती भापकर यांनी आपल्या प्रास्ताविकात देशातील विदारक राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, “आपण सर्व महापुरुषांचे विचार सोबत घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या शूर सैनिकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. शिवराय ते भीमराय हा आपल्या महाराष्ट्राचा श्वास आहे आणि म्हणूनच या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले आहे!” राजाभाऊ गोलांडे यांनी व्याख्यानमाला समन्वय समितीची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय मनोगतात मानव कांबळे यांनी सामाजिक विषमता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकारच्या विरोधात बोलले की तो देशद्रोह ठरतो. अशा परिस्थितीत शाहू – फुले – आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना संविधानाच्या तलवारीने लढावे लागेल!”

यानंतर अभिनेते किरण माने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून आपणही या समाजाचे घटक आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळली आणि रायगडाला भेट दिली. बुद्धिप्रामाण्यवादी बाबासाहेबांच्या या प्रत्येक कृतीमागे एक तार्किक विचार होता. छत्रपती शिवरायांनी मुस्लिमांसह अठरापगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केले ते का लयास गेले, यावर त्यांनी आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. शिवशाहीचे पेशवाईत रूपांतर कसे झाले, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. छत्रपतींचे आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांच्यात भिंत का निर्माण झाली? शिवरायांची महानता केवळ युद्धांमधील पराक्रमापुरती मर्यादित होती का? या प्रश्नांची खरी उत्तरे मिळू नयेत, याची सोय एका विशिष्ट विचारसरणीने करून ठेवली. मात्र, बाबासाहेबांच्या ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकात या सगळ्याचे विश्लेषण दिलेले आहे. दुर्दैवाने, या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवल्या गेल्या नाहीत, कारण ब्राह्मण्यवादी लेखकांनी इतिहासाची रचना बदलून टाकली. खरा इतिहास लोकांसमोर येऊच दिला नाही.”

माने पुढे म्हणाले, “वास्तविक छत्रपती शिवरायांनी ब्राह्मणांसहित अठरापगड जातींचे रक्षण केले. तरीही त्यांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हे जे बिरुद लावले गेले ते खोटे आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भोपटकर वकील यांच्या भेटीचा किस्साही पूर्णपणे काल्पनिक आहे. शिवरायांच्या मनात मुस्लिमांबद्दल कोणताही द्वेष नव्हता. काही इतिहासकारांनी आता खरे शिवराय लोकांसमोर आणले आहेत. ज्या इतिहासाचे वर्तमानकाळाशी नाते जोडता येते, तोच खरा इतिहास असतो. शिवरायांची खरी महानता त्यांच्या युद्धांमधील शौर्यापेक्षाही त्यांनी रयतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांचे मावळे त्यांच्यासाठी प्राणांची बाजी लावत असत. शिवरायांवर संत तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव होता आणि तोच प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही होता. त्यांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रावर तुकोबांचा अभंग उद्धृत केलेला असे. स्वतः बाबासाहेबांनी सांगितले आहे की, संविधानाची मांडणी करताना त्यांच्या मनात तुकोबांचे अभंग होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी कार्य केले, तरीही एका वर्चस्ववादी व्यवस्थेने त्यांना केवळ एका जातीपुरते मर्यादित केले आहे. म्हणूनच, शिवराय आणि भीमराय यांच्या अनुयायांनी आता आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे!” असे आवाहन किरण माने यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे आणि त्यांच्या विचारांवर सखोल भाष्य केले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!