news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home पिंपरी चिंचवड विदेशी मालाच्या विरोधात लढताना वयाच्या २२ व्या वर्षी बलिदान देणारे शूर क्रांतिकारी बाबू गेनू! महापालिका प्रशासनाने केले आदरांजली अर्पण

विदेशी मालाच्या विरोधात लढताना वयाच्या २२ व्या वर्षी बलिदान देणारे शूर क्रांतिकारी बाबू गेनू! महापालिका प्रशासनाने केले आदरांजली अर्पण

तृप्ती सांडभोर, अण्णा बोदडे, किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहीद बाबू गेनू यांचे बलिदान देशात क्रांतीची बीजे पेरणारे ठरले!

 

 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे प्रतिपादन; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहीद दिनानिमित्त आदरांजली

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर २०२५) पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद बाबू गेनू यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.

अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले की, शहीद बाबू गेनू यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विदेशी कपडे भारतात विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी, त्याचा विरोध करताना जे बलिदान दिले, त्याने देशात सर्वत्र क्रांतीची बीजे पेरली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा घटनांमधून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना देश स्वतंत्र करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली.

  • बाबू गेनू हे इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्भयपणे उभे राहिलेले शूर क्रांतिकारी म्हणून ओळखले जातात.

  • विदेशी मालाच्या बहिष्कार टाकण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान ते शहीद झाले.

  • देशासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्या बाबू गेनूंचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे ठरले.

या अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अंकुश कदम, स्वप्निल भालेराव, आरेखक हनुमंत टिळेकर तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!