‘प्रेम संबंध’ ते ‘छेडछाड’ गुन्हा: वाईत आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर!
भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात ॲड. रवींद्र आरु आणि टीमला मोठे यश; ‘खोटा गुन्हा’ असल्याचे सिद्ध करण्याचा युक्तिवाद
वाई, प्रतिनिधी बालाजी नवले (११ ऑक्टोबर २०२५) मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाई पोलीस स्टेशनमध्ये छेडछाड, लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर आरोपांखाली भारतीय न्याय संहिता () आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम () अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी () चा अटकपूर्व जामीन वाई न्यायालयाने मंजूर केला आहे.
मे. मेहरे साहेब, अती. जिल्हा न्यायाधीश, वाई, सातारा यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला.
केसचा तपशील
या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम तसेच बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) चे कलम व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्जदाराच्या मुलाचे (आरोपी क्र. विधीसंघर्षित बालक) आणि फिर्यादीचे प्रेम संबंध फिर्यादीच्या घरी उघडकीस आले होते. यानंतर फिर्यादी यांनी घरच्यांच्या दबावत दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला.
ॲड. रवींद्र आरु आणि टीमचा यशस्वी युक्तिवाद
आरोपी क्र. च्या बाजूने ॲड. रवींद्र आरु (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आझाद समाज पार्टी, लीगल सेल) आणि ॲड. प्रविण जगताप यांनी यशस्वीरीत्या बाजू मांडली. ॲड. निकिता बनसोडे, ॲड. श्रीकांत ओव्हाळ आणि ॲड. महेश गायकवाड यांनी देखील या प्रकरणात एकत्रित काम पाहिले.
ॲड. रवींद्र आरु आणि त्यांच्या टीमने अतिशय हुशारीने व खंबीरपणे बाजू मांडत, कायदेशीर कसोटीतून आणि प्रभावी युक्तिवादातून हाणून पाडण्यात यश मिळवले आणि पक्षकारांना जामीन मिळवून दिला. कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर सर्वत्र त्यांच्या कार्याची आणि कौशल्याची चर्चा व कौतुक केले जात आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

1 comment
nice job max manthan