अधिकारी आणि कर्मचारी हीच महापालिकेची ‘खरी ताकद’: ३६ जणांना ‘गुणवंत पुरस्कार’ प्रदान!
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे मत; सह शहर अभियंता देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे यांचा विशेष सन्मान
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे. दिनांक ११/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त, महापालिकेची खरी ताकद अधिकारी आणि कर्मचारीच असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. ‘प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक गुणवंत कर्मचाऱ्याचा सन्मान हा संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कार’ वितरण सोहळ्यामध्ये महापालिकेच्या सेवेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त प्रमुख अधिकारी
पुरस्कारांमध्ये सह शहर अभियंता देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे यांचा समावेश होता.
यावेळी अतिरिक्त आयुक्त पाटील म्हणाले की, सेवाभाव, कार्यतत्परता आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळेच पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
पुरस्कारार्थींच्या वतीने उपायुक्त अण्णा बोदडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “महापालिकेतील सहकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामगिरी शक्य झाली. या सन्मानामुळे पुढील काळातही अधिक उत्साहाने, पारदर्शकतेने आणि जनहिताच्या भावनेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

या सोहळ्याला महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, उपायुक्त पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे (३६ जण)
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
