पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा बिगुल! १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; बहुसदस्यीय प्रभाग रचनेसह १२८ जागांसाठी लढत
२३ ते ३० डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत; चार सदस्यीय प्रभागरचना निश्चित
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
राज्य निवडणूक आयोगाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
| कार्यक्रम | तारीख |
| नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करण्याची मुदत | २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ |
| अर्ज छाननीची तारीख | ३१ डिसेंबर २०२५ |
| उमेदवारी माघारीची अंतिम तारीख | ०२ जानेवारी २०२६ |
| चिन्ह वाटप व अंतिम यादी जाहीर | ०३ जानेवारी २०२६ |
| मतदानाची तारीख | १५ जानेवारी २०२६ |
| मतमोजणीची तारीख | १६ जानेवारी २०२६ |
| तपशील | माहिती |
| निवडणुकीची पद्धत | बहुसदस्यीय (Multi-member Ward System) |
| प्रभागरचना | चार सदस्यीय |
| एकूण प्रभाग | ३२ |
| एकूण जागा | १२८ |
| मतदारांची संख्या | १७ लाख १३ हजार ८९१ |
| पुरुष मतदार | ९ लाख ५ हजार ७२८ |
| स्त्री मतदार | ८ लाख ७ हजार ९६६ |
| इतर मतदार | १९७ |
| मतदान केंद्रे | २ हजार ४४ |
| खर्चाची मर्यादा (प्रत्येक उमेदवार) | १३ लाख रुपये |
| मतदारांचे अधिकार | प्रत्येक मतदाराला ४ मते देण्याचा अधिकार |
| मतदान यंत्रणा | ईव्हीएम (EVM) चा वापर |
| नियुक्ती | ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती |
निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत.
-
कार्यालय १: स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी (प्रभाग क्र. १०, १४, १५ व १९)
-
कार्यालय २: ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, चिंचवडगाव (प्रभाग क्र. १६, १७, १८ व २२)
-
कार्यालय ३: क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, भोसरी (प्रभाग क्र. २, ६, ८ व ९)
-
कार्यालय ४: ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे (प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९)
-
कार्यालय ५: कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी (प्रभाग क्र. ३, ४, ५ व ७)
-
कार्यालय ६: सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल (प्रभाग क्र. १, ११, १२ व १३)
-
कार्यालय ७: ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव (प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७)
-
कार्यालय ८: पिंपरी चिंचवड बॅडमिंटन हॉल, पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी (प्रभाग क्र. २०, ३०, ३१ व ३२)
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व पात्र मतदारांनी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करावे, यासाठी व्यापक स्वीप मोहीम राबवण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.
