‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२५’: उद्योजकांसाठी पुणे येथे एकदिवसीय कार्यशाळा
रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते उद्घाटन; उद्योजकतेच्या विकासासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ११ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
उद्योजकता आणि व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिंपरी चिंचवड उद्योजकता विकास आघाडी आणि ब्रह्मोद्योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथील हॉटेल कलासागर, भोसरी फाटा येथे ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२५’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन भारत सरकारचे रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते होणार आहे.
व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन
या कार्यशाळेत उद्योजक, व्यावसायिक आणि नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी पीतांबरीचे रवींद्र प्रभू देसाई, रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक श्री. सतीश मराठे, महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप कमिटीचे सदस्य श्री. प्रसन्न देशपांडे, आणि बुलढाणा बँकेचे शिरीष देशपांडे यांच्यासह अनेक तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेत सरकारी कर्ज, अनुदान योजना, आर्थिक व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवहार्यता, निर्यात संधी, मार्केटिंग आणि ब्रँडिंग धोरणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
नेटवर्किंगची मोठी संधी
उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स, कन्सल्टंट्स, तसेच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेमुळे उपस्थितांना नेटवर्किंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटची मोठी संधी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपयुक्त कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रसाद गिजरे (९८५०११६४६१) आणि मुकुंद कुलकर्णी (९८२२४०७८१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

1 comment
Hi Max Manthan keep it up