news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home पिंपरी चिंचवड भाजपमध्ये ओबीसी, व्हिजेएनटी समाजाची मोट बांधण्याची जबाबदारी गणेश रामराव ढाकणे यांच्या खांद्यावर!

भाजपमध्ये ओबीसी, व्हिजेएनटी समाजाची मोट बांधण्याची जबाबदारी गणेश रामराव ढाकणे यांच्या खांद्यावर!

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे ढाकणे; आमदार उमाताई खापरे व अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सक्रिय. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कामाची पावती! गणेश रामराव ढाकणे यांची पुन्हा ओबीसी, व्हिजेएनटी आघाडी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

 

 

२० वर्षांचा अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि प्रभावी संघटन कौशल्य; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा विश्वास

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात गेली वीस वर्षे वास्तव्यास असलेले आणि ओबीसी समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय नेते गणेश रामराव ढाकणे यांची भारतीय जनता पार्टी (BJP) ओबीसी, व्हिजेएनटी (VJNT) आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवाची व दांडग्या जनसंपर्काची पावती म्हणून शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी ही जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे सोपवली आहे.

गणेश ढाकणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केली.

  • भाजप संघटनात्मक कार्य: २००७ पासून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मंडल स्तरावर काम केले. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी २०१६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे मंडल जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले.

  • नेतृत्व व पद: आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी २०२१ मध्ये जिल्हा सरचिटणीस (भारतीय जनता पक्ष) या पदावर काम पाहिले. आमदार शंकर शेठ जगताप यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन २०२३ मध्ये त्यांना ओबीसी व्हिजेएनटी विभागाच्या शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.

  • सामाजिक कार्य: पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहराच्या विविध भागात वंजारी समाजाचे संघटन करण्याचे काम जोरदार केले. त्यांनी २०२० पर्यंत भगवान सेना पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तसेच २०२१ ते २०२४ पर्यंत जय भगवान महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले.

  • इतर संघटना: शहरात ते ओबीसी संघर्ष समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असणारे नेते म्हणून ओळखले जातात.

पिंपरी गावात गेली वीस वर्षे वास्तव्यात असल्याने गणेश ढाकणे यांचा घरोघरी दांडगा जनसंपर्क आहे. ते शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांचा विद्यार्थी आणि पालक वर्गाशी घनिष्ट संबंध आहे. युवकांचे संघटन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा असून, त्यांच्यामागे प्रभागातीलच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांची मोठी फळी उभी आहे.

गणेश ढाकणे यांनी विश्वास व्यक्त केला की, “प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पक्ष ज्याही कॅटेगिरीमध्ये उमेदवार म्हणून संधी देईल, त्याचं नक्कीच सोनं करेल.”

सध्या विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरेअमित गोरखे यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी व्हिजेएनटी समाजाची पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोट बांधण्याचे काम गणेश ढाकणे सक्रियपणे करत आहेत. नियुक्तीपत्र घेताना सोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका योगिता नागरगोजे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे दीपक नागरगोजे व कार्यकर्ते उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!