news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड केवळ राजकारण नव्हे, सेवा हेच ध्येय: पिंपळे सौदागरमध्ये भाजपची कार्यशाळा

केवळ राजकारण नव्हे, सेवा हेच ध्येय: पिंपळे सौदागरमध्ये भाजपची कार्यशाळा

रक्तदान, आरोग्य शिबिर, स्वच्छता आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा प्रचार; विविध उपक्रमांनी 'सेवा यज्ञ' साजरा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘सेवा पंधरवडा’ अभियानासाठी भाजप सज्ज; पिंपळे सौदागर येथे जिल्हा कार्यशाळा संपन्न

 


 

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचे आवाहन

 

पिंपळे सौदागर,पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे ११ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजप) देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा २०२५’ हे अभियान राबवणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड शहराची जिल्हा कार्यशाळा पिंपळे सौदागर येथे पार पडली. यावेळी प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


‘सेवा हेच ध्येय’

 

या कार्यशाळेत बोलताना राजेश पांडे यांनी ‘संघटन हीच शक्ती आणि सेवा हेच ध्येय’ हा मंत्र प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजवावा असे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचावी यासाठी बूथ आणि मंडल स्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना मदत करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रास्ताविक करताना कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.

आमदार महेश लांडगे यांनी हे अभियान एक ‘सेवायज्ञ’ असून यात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आमदार शंकर जगताप आणि आमदार अमित गोरखे यांनीही ‘सेवा पंधरवडा’ यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


विविध उपक्रमांची मालिका

 

या ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आणि स्वच्छता अभियानांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, वृक्षारोपण, ‘वोकल फॉर लोकल’चा प्रचार, मोदी विकास मॅरेथॉन, ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धा, आणि खादी वस्तूंची खरेदी अशा अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला माजी आमदार आश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर नितीन काळजे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले,सरचिटणीस मोरेश्वर शेडगे,विकास डोळस,मधुकर बच्चे,वैशाली खाड्ये, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे,युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे,जिल्हा प्रवक्ते कुणाल लांडगे,मंडल अध्यक्ष गणेश ढोरे,मोहन राऊत,सोमनाथ तापकीर, अनिता वाळुंजकर, शिवराज लांडगे ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ,राम वाकडकर, राजाभाऊ मासूळकर,यशवंत भोसले,मनोज ब्राम्हणकर तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा संकल्प अधिक बळकट झाला आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!