श्रद्धेय बाबा आढाव यांना आदरांजली: ‘कृतिशील सत्यशोधकी समाजवादी नेता पुन्हा होणे नाही’ – आदरणीय प्रवीण तुपे
श्रमिकांचे कैवारी बाबा आढाव यांचे कार्य अविस्मरणीय; हडपसर येथील श्रद्धांजली सभेत मान्यवरांकडून गौरव
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
ज्येष्ठ कामगार नेते आणि कृतिशील समाजवादी विचारवंत श्रद्धेय बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी हडपसर, साडेसतरा नळी, दांगट वस्ती येथील समाज मंदिरामध्ये रविवार, दिनांक १४ डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय प्रवीण सादबा तुपे यांनी, “ज्यांच्या हात जोडून पाया पडावे, नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत असा कृतिशील सत्यशोधकी समाजवादी नेता पुन्हा होणे नाही,” असे भावपूर्ण प्रतिपादन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी व भटक्या विमुक्त जमाती संघटना शहराध्यक्ष रमेश भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “बाबा आढाव हे महाराष्ट्रातील श्रमिकांना ‘एक रुपया मध्ये पोटभर जेवण’ खाऊ घालणारे एकमेव कृतिशील समाजवादी नेते होते.”
बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजव्यवस्थेने नाकारलेल्या घटकांसाठी समर्पित केले. त्यांनी ज्यांच्यासाठी अविरत कार्य केले ते घटक पुढीलप्रमाणे:
-
-
देवदासी प्रथा आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या घटकांच्या (उदा. काच पत्रा गोळा करणारे, ऊसतोड कामगार) उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.सत्यशोधकी विचारधारा: बाबा आढाव हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित समाजवादी विचारसरणीचे समर्थक होते.
-
सामाजिक कृती: त्यांनी पुणे शहर व महाराष्ट्रात सामाजिक विषमतेविरोधात आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने उभी केली.

१. हमाल पंचायतीची स्थापना:
-
योगदान: बाबा आढाव यांचे सर्वात महत्त्वाचे आणि ऐतिहासिक योगदान म्हणजे त्यांनी पुण्यात ‘हमाल पंचायतीची’ स्थापना केली.
-
परिणाम: असंघटित क्षेत्रातील हमालांना न्याय, कामाचे निश्चित तास आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या संघटनेने मोठे काम केले. हमालांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
२. ‘एक रुपयात जेवण’ योजना:
-
त्यांनी श्रमिकांसाठी अत्यंत कमी दरात (एक रुपया) पोटभर जेवण उपलब्ध करून देणारी योजना सुरू केली. श्रमिकांची भूक भागवून त्यांना सन्मानाने जगण्याचा आधार देणारा हा उपक्रम खूप गाजला.
३. रिक्षा पंचायतीचे नेतृत्व:
-
पुण्यातील रिक्षाचालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी त्यांनी रिक्षा पंचायतीचे नेतृत्व केले.
४. देवदासी आणि दुर्लक्षित घटकांसाठी कार्य:
-
-
ते ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणूनही ओळखले जात. शेतकरी, कष्टकरी आणि असंघटित कामगारांना एकत्र आणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते नक्षलवादी चळवळीपर्यंतच्या अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
बाबा आढाव यांचे निधन हे सत्यशोधक चळवळ, समाजवादी विचारप्रणाली आणि महाराष्ट्रातील कष्टकरी वर्गासाठी एक मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.
-
रमेश भोसले यांनी पुढे नमूद केले की, बाबा आढाव यांनी कार्य करत असताना डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर नीलम गोरे, पद्मश्री लक्ष्मण माने, प्राध्यापक हरी नरके, रामनाथ चव्हाण, व्यंकप्पा भोसले, शिवलाल जाधव असे अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या जाण्याने सत्यशोधकी चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
या श्रद्धांजली सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात अखिल महाराष्ट्र मैराळ, दांगट, वीर समाजसेवा संघटनेचे अध्यक्ष अनंता भोसले, भटक्या विमुक्त जमाती संघटना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रमेश भोसले, पाटबंधारे अधिकारी सोपान जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे, मारुती भोसले, दिलीप भोसले, देविदास मोरे, रुपेश पवार, कुशल संघटक दीपक मोरे, सतीश भोसले, कृष्णा भोसले, मंगेश साळुंखे, पवन भोसले, स्वप्निल कदम, गणेश पोळ, दीपक कदम, समाधान पवार यांचा समावेश होता.
सर्व समाज बांधवांच्या वतीने शेवटी साने गुरुजींच्या प्रसिद्ध ‘आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही’ या कवितेने सभेची सांगता करण्यात आली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
