सुरेल संध्याकाळ: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराचा जल्लोष!
मराठी-हिंदी गीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध; ‘सेवाभाव’ सोबत ‘कलाकार’ अधिकारी-कर्मचाऱ्यांची रंगमंचावर कमाल
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक ११/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या गीतगायनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे एक सुरेल आणि बहारदार संध्याकाळ रंगली. प्रशासनातील जबाबदारी निभावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आपल्या गायनकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि ४३ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष साजरा केला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, उपायुक्त पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत आणि कलेचा सुरेख मिलाफ
या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या मराठी आणि हिंदी गीतांच्या सुमधुर सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. सादरीकरणातून भाव, अभिव्यक्ती आणि ताल यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
आपल्या दैनंदिन कार्यात प्रामाणिकपणे झटणारे हे अधिकारी-कर्मचारी जेव्हा रंगमंचावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमामुळे केवळ मनोरंजनच झाले नाही, तर महापालिका परिवारामध्ये आपुलकी, एकता आणि सामूहिकतेचा भाव अधिक दृढ झाला. ४३ व्या वर्धापन दिनाचा हा सुरेल जल्लोष पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक संवेदनांना नवचैतन्य देणारा ठरला.

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी संयोजन केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि उपअभियंता किरण अंदुरे यांनी केले.
या गीतगायनाच्या कार्यक्रमात के. के. काशिद, प्रदीप कोठावदे, विनोद सरकानिया, वैशाली शेलार, पुष्पलता दहिहंडे, अनिल सुतार, उज्ज्वला करपे, सागर आठवाल, महेंद्र अडसूळ, जाहीरा मोमीन, संतोष सारसर, किरण अंदुरे, सुरेश मिसाळ, अनिल लखन, रविंद्र कांबळे, स्मिता जोशी, सतिश गायकवाड, राजू कांबळे, रविंद्र ओव्हाळ, विजय कांबळे, चारुशीला फुगे, सुलक्षना कुरणे, समीर पटेल, विभावरी दंडवते, आकाश गिरबिडे, सुनिता राऊत, वैशाली थोरात, विकास जगताप आदींनी सहभागी होऊन गाणी सादर केली.
वाद्यसाथ नितीन खंडागळे, नितीन पवार, शाम चंदनशिवे, सुनिल गायकवाड, प्रविण जाधव, मनोज मोरे यांनी दिली.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
