news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड चापेकर बंधूंच्या त्यागाचे आणि शौर्याचे प्रत्यक्ष दर्शन! राज्यपाल आर्लेकर झाले मंत्रमुग्ध, तरुणांना चिंचवडला येण्याचे आवाहन

चापेकर बंधूंच्या त्यागाचे आणि शौर्याचे प्रत्यक्ष दर्शन! राज्यपाल आर्लेकर झाले मंत्रमुग्ध, तरुणांना चिंचवडला येण्याचे आवाहन

हुबेहूब शिल्पे आणि चलचित्रांद्वारे इतिहास जाणून घेतला; भारत मातेच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा दिला संदेश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाला सदिच्छा भेट!

 


 

“तरुणांनी चापेकर बंधूंकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी” – राज्यपाल आर्लेकर यांचे आवाहन; महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले स्वागत

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ऑक्टोबर २०२५मॅक्स मंथन डेली न्यूज:

केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज ( ऑक्टोबर २०२५) चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला सदिच्छा भेट देऊन स्मारकाची पाहणी केली. चापेकर बंधूंच्या शौर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागाच्या गोष्टी चलचित्रांद्वारे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांनी देशातील तरुणांना चिंचवड येथे येऊन प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

चापेकर स्मारकाची पाहणी करून हुबेहूब दिसणारी शिल्पे आणि चलचित्रपटाद्वारे हुतात्मा चापेकर बंधूंचा इतिहास जाणून घेतल्यानंतर राज्यपाल आर्लेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

राज्यपाल आर्लेकर यांचे गौरवोद्गार

 

राज्यपाल आर्लेकर म्हणाले, “आम्ही क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याच्या, प्रखर देशभक्ती व त्यागाच्या गोष्टी इतिहासात वाचत होतो, त्याचे प्रत्यक्ष दर्शन आज चलचित्राद्वारे आम्हाला घडले आहे.”

ते पुढे म्हणाले, “हुतात्मा चापेकर वाड्यामध्ये परंपरा, संस्कृतीच्या अनेक सुंदर छटा पहावयास मिळाल्या. चापेकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि त्याग याची छोटीशी झलक बघता आली. देशांतील तरुणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे व त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी आणि भारत मातेच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत रहावेत.”

स्वागत आणि सन्मान

 

  • महापालिकेकडून स्वागत: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे स्वागत केले.
  • चापेकर स्मारक समितीकडून सत्कार: चापेकर स्मारक समितीच्या वतीने राज्यपालांना सन्मानचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, मुकुंदराव कुलकर्णी, सदस्य डॉ शकुंतला बन्सल, सुहास पोफळे, अतुल आडे, मैथिली कुलकर्णी, सतिश अवचार, नरेंद्र पेंडसे, हेमंतराव हरहरे आणि संग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!