news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड उज्ज्वल भविष्यासाठी जपानची वाट! PCCOE मध्ये सलग चौथ्या वर्षी रोजगार संधीवर मार्गदर्शन शिबिर

उज्ज्वल भविष्यासाठी जपानची वाट! PCCOE मध्ये सलग चौथ्या वर्षी रोजगार संधीवर मार्गदर्शन शिबिर

विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी झेप घेतलेल्या जपानमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी; तज्ज्ञांकडून थेट संवाद आणि शंकांचे निरसन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जपानमध्ये ‘गोल्डन’ संधी: च्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेतन, सुरक्षित भविष्य!

 


 

‘भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा’ – अध्यक्ष रेन्या किकूची यांचे मत; च्या शिबिरात जपानी भाषा शिकण्यावर भर

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, (११ ऑक्टोबर २०२५) मॅक्स मंथन डेली न्यूज:

जपानी तंत्रज्ञानाला जगभरात प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत, भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा असून त्यांच्यासाठी जपानमध्ये रोजगाराच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत, असे मत चे अध्यक्ष रेन्या किकूची यांनी व्यक्त केले. जपानमध्ये राहण्यासाठी उत्तम सुखसोयी आणि चांगले वेतन मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने या संधींचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या () पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (), निगडी येथे जपानमधील रोजगार संधी या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मध्ये सलग चौथ्या वर्षी या महत्त्वपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जपान-भारत मैत्री, संधी आणि भाषेचे महत्त्व

 

कार्यक्रमात बोलताना जलतापचे संस्थापक सदस्य डॉ. हरी दामले म्हणाले, भारत आणि जपान यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सौहार्दपूर्ण संबंध आहेत, ही मोठी जमेची बाजू आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जपानने मोठी झेप घेतली असून, भविष्याच्या दृष्टीने तेथे अनेक संधी आहेत. या संधींचा फायदा घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी जपानी भाषा शिकण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांनी जपानमधील संधींचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.

चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी संस्थेच्या प्रयत्नांची माहिती दिली. मागील चार वर्षांपासून मध्ये जपानमधील शैक्षणिक आणि रोजगार संधींवर कार्यशाळा आयोजित होत आहेत. विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत मागील वर्षी पंधरा विद्यार्थ्यांनी जपानला भेट दिली. संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आज जपानमध्ये कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांकडून थेट संवाद आणि शंकांचे निरसन

 

दुपारच्या सत्रात उपस्थित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी सूत्र सिस्टीम्सचे मुख्य अभियंता रुपेश मेतकर, डेटा इं. वरिष्ठ मानव संसाधन प्रमुख संजय खोराटे, मोसाइक प्रा. लि. बंगलोर हिरो इशिदा, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे आणि स्वाती भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी फ्युचरटेक इं. प्रा. लि. चे सीईओ आनंद शिरळकर, चे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यशस्वी आयोजनामागील नेतृत्व

 

या मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक डॉ. रोशनी राऊत यांनी केले, तर डॉ. संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा यशस्वी कार्यक्रम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट () चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!