ऐतिहासिक धम्मभूमीवर २१ ते २५ डिसेंबर दरम्यान भव्य ‘धम्मभूमी फेस्टिवल’; भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत महाबुद्धवंदना!
समारोप शिवभीम शाहीरा सीमा पाटील यांच्या ‘We The People’ या प्रबोधन नाट्याने; बुद्ध-भीम अनुयायांना टेक्सास गायकवाड यांचे आवाहन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु, त्या दोन वर्षांपूर्वी, २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर बुद्धरूप स्थापन करून महाराष्ट्रातील जनतेला ‘बुद्धाच्या ओटीत’ टाकले होते. या महत्त्वपूर्ण घटनेच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धविहार कृती समिती तर्फे देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर २१ ते २५ डिसेंबर २०२५ दरम्यान भव्य ‘धम्मभूमी फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टिवलचा समारोप शिवभीम शाहीरा सीमा पाटील आणि जॉली मोरे यांच्या ‘We The People’ या संगीत नाट्य कृतीने होणार आहे.
बुद्ध धम्म दीक्षा सोहळा: २५ डिसेंबर २०२५ रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख भंते विनाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबुद्धवंदना पार पडणार आहे. त्यानंतर भंते विनाचार्य यांच्या हस्ते बुद्ध धम्म दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
परिषद व उद्घाटन:
-
सकाळी ११ वाजता महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती समर्थन परिषदेचे आयोजन केले आहे.
-
याचे उद्घाटन भंते विनाचार्य यांच्या हस्ते होणार आहे.
परिषदेतील मान्यवर:
विलास खरात (राष्ट्रीय अध्यक्ष सनातन धर्म), डी एस नरसिंगे (राज्याध्यक्ष सत्यशोधक समाज महासंघ), पद्मश्री लक्ष्मण माने (माजी आमदार), पैगंबर शेख (मुस्लिम समाज सुधारक), डॉ. राजेंद्र भालशंकर (पाली भाषा अभ्यासक), विनोद राऊत (पत्रकार), डॉ मिलिंद तायडे, योगेश राऊत, मंगलदास पडवेकर, सुरेश भालेराव हे सर्व मान्यवर यामध्ये सामील होणार आहेत.
दुपारी ४ वाजता विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
| पुरस्कार | प्राप्तकर्ते | पद/क्षेत्र |
| प्रबुद्ध रत्न पुरस्कार | खासदार राजाराम | बीएसपी |
| प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्कार | डॉ. सुभाष खंडारे | वर्धा |
| गानसम्राट पुरस्कार | प्रसिद्ध गायक आनंद शिंदे | – |
| न्यायरत्न पुरस्कार | ॲड. सुनील डोंगरे | – |
| वृत्तरत्न पुरस्कार | संजय आवटे | प्रसिद्ध पत्रकार |
| धम्मरत्न पुरस्कार | जॉली मोरे | – |
| भीमरत्न पुरस्कार | विजय तुकाराम गायकवाड, प्रभाकर कवडे, प्रज्ञा गवळी सोनवणे | मुख्याध्यापिका ज्ञान प्रभात विद्यालय |
| उद्योगरत्न पुरस्कार | अमोल ठोकळे | – |
| समाजरत्न पुरस्कार | उत्तमराव कामठे | – |
| क्रांतिरत्न पुरस्कार | सतीश काळे | – |
फेस्टिवलमध्ये २१ ते २४ डिसेंबर दरम्यान खालीलप्रमाणे विविध स्पर्धा आणि सादरीकरणे आयोजित करण्यात आले आहेत:
| दिनांक | वेळ | दिवस | कार्यक्रम/स्पर्धा | विषय/माहिती |
| २१ डिसेंबर | दु. १२.०० | रविवार | २२ प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा, निबंध स्पर्धा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महास्वप्न आणि आजचे आव्हान |
| २२ डिसेंबर | सायं. ६.०० | सोमवार | वक्तृत्व स्पर्धा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड महत्त्व |
| २२ डिसेंबर | सायं. ७.०० | सोमवार | एकपात्री नाट्य स्पर्धा | बहुजन महानायक आणि महानायिका यांच्या जीवनावर आधारित |
| २३ डिसेंबर | सायं. ६.०० | मंगळवार | महिलांसाठी स्पर्धा | मुलांवर धम्मसंस्कार कसे करावेत? |
| २३ डिसेंबर | सायं. ७.०० | मंगळवार | प्रबुद्ध कवींचे संमेलन | महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी |
| २४ डिसेंबर | सायं. ५.०० | बुधवार | भव्य भीम शाहिरी स्पर्धा | बक्षीस: २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ४ वैयक्तिक ५ बक्षीस |
| २५ डिसेंबर | सायं. ६.३० | बुधवार | संगीत नाट्य कृती | शिवभीम शाहीरा सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा ‘We The People’ |
भीमपुत्र टेक्सास गायकवाड (संस्थापक / अध्यक्ष बुद्ध विहार कृती समिती) यांनी भीम आणि बुद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने या धम्मभूमी फेस्टिवल मध्ये वैयक्तिकरित्या, संघटनाद्वारे तसेच बुद्धविहाराद्वारे सामील व्हावे, असे आवाहन केले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
