पिंपरी-चिंचवड पोलिसांची गुन्हेगारांवर मोठी कारवाई! एप्रिलमध्ये २१ सराईत तडीपार!
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार, एप्रिल २०२५ मध्ये परिमंडळ तीन कार्यक्षेत्रातील तब्बल २१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व तडीपार गुन्हेगार २० ते ५५ वयोगटातील आहेत आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२५ मध्येही ७ आरोपींना तडीपार करण्यात आले होते. एप्रिलमधील या कारवाईमुळे एकूण २१ गुन्हेगारांना त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांपासून दूर ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या, पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनमधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर आहे.

कोणत्या पोलीस ठाण्यातून किती जण तडीपार?
- दिघी पोलीस ठाणे: हनुमंत नामदेव भोसले (३ महिने), निर्जला गणेश कुंभार (१ वर्ष), सुपडा काशीराम सुर्यवंशी (२ वर्षे), पंढरीनाथ सुभाष सुर्यवंशी ऊर्फ पाटील (२ वर्षे), सुशांत दिपक भोसले आणि धनंजय आकाश दुनगाव (प्रत्येकी १ वर्ष).
- चिखली पोलीस ठाणे: बुद्धभुषण उर्फ बुध्या माणीक पालके (२ वर्षे), सुमित ऊर्फ सुम्या विलास क्षिरसागर (२ वर्षे), आदर्श उर्फ डपक्या गौतम खंदारे (२ वर्षे), प्रतिक बंडु शेलार (२ वर्षे).
- महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे: नितीन सखाराम तांबे (१ वर्ष), अतुल बाळासाहेब चौधरी (टोळी प्रमुख) आणि स्वप्नील बाळासाहेब चौधरी (टोळी सदस्य) (प्रत्येकी १ वर्ष), आकाश बाळासाहेब शेळके (टोळी प्रमुख), नारायण सुनिल घावटे (टोळी सदस्य) आणि गणेश हिरामण लिंबोरे (प्रत्येकी २ वर्षे).
- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे: अभिजीत ऊर्फ धीरज विलास निटुरे (१ वर्ष).
- चाकण पोलीस ठाणे: अजय ऊर्फ विजय दगडू पवार (२ वर्षे), आकाश संजय तिकोणे (२ वर्षे), तुषार ऊर्फ गोल्या रामराव राठोड (२ वर्षे), ओंकार ऊर्फ मोन्या नवनाथ पहऱ्हाड (२ वर्षे).

या गुन्हेगारांवर महाराष्ट्र जुगार कायदा, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि भारतीय दंड विधान कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. काहींवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार आणि खंडणीसारखे गंभीर आरोप आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तडीपार केलेले गुन्हेगार त्यांच्या हद्दपारीच्या काळात पुणे जिल्ह्यात कोठेही दिसल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष (११२) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कठोर कारवाई निश्चितच शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यास मदत करेल, यात शंका नाही.
तुमचे याबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!
