news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड मंगलताई शिंदे यांची यशस्वी वाटचाल

मंगलताई शिंदे यांची यशस्वी वाटचाल

चिंचोशीच्या सरपंचपदी निवड, गावात जल्लोष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गावकऱ्यांकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन

खेड तालुक्यातील चिंचोशी गावच्या सरपंचपदी माननीय सौ. मंगलताई ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावात मोठा आनंद व्यक्त होत आहे. या आनंदात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य कार्यकारणी सदस्य माननीय श्री अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या राहत्या घरी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात चिंचोशी गावचे विद्यमान उपसरपंच माननीय श्री संतोष गोकुळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात २०२० पासून ते २०२५ पर्यंतच्या खडतर प्रवासाची माहिती दिली आणि सौ. शिंदे यांच्या यशाबद्दल सविस्तर वर्णन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा सचिव माननीय श्री नितीन कुटे यांनी केले. श्री अशोक पंडित यांनी आपल्या भाषणात सौ. शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना म्हटले, “कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावे लागते आणि मोठे होण्यासाठी मोठे मन असावे लागते. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेल्या आदरणीय मंगलताई शिंदे” अशा शब्दात त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

माजी सरपंच श्री. भाऊसाहेब यादव, मा. श्री तानाजी वाळुंजकर, मा. श्री. बळीराम मंडलिक, मा. श्री मनोज विळस्कर, मा श्री तेजस पंडित यांनी देखील सौ. शिंदे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले आणि अभिनंदनपर भाषणे दिली.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अशोकराव मगर यांनी आपल्या भाषणात राजकारणातील एक सुंदर उदाहरण देताना सांगितले, “मा. श्री शरद पवार नेहमी म्हणायचे, तुम्ही नगरसेवक व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, पण एक वेळेस गावचा सरपंच होऊन दाखवा.” असे बोलून त्यांनी सौ. शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच सौ. मंगलताई शिंदे यांनी नाभिक समाज आणि चिंचोशी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला माजी उपसरपंच श्री अमोल कानडे, ज्ञानेश्वर शिंदे, किसन शिंदे, हरिदास शिंदे, दत्तात्रय शिंदे राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, राहुल शिंदे अमोल शिंदे, योगेश शिंदे, मच्छिंद्र शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता गणपतीच्या आरतीने करण्यात आली. आभार प्रदर्शन माननीय श्री सोमनाथ शिंदे भोसरी विभागीय अध्यक्ष यांनी केले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!