शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची मोठी संधी! – ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर; अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, १५ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेकरिता () शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. यामुळे पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आणखी काही दिवस मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
परीक्षा अर्ज भरण्याचे सुधारित वेळापत्रक
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
महत्त्वाची नोंद: दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे किंवा पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची संबंधित शाळा आणि उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळे:
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.






