news
‘टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश’; दारापूर येथे दिमाखदार सांस्कृतिक उपक्रम!‘फाटकाचा खोळंबा संपला, मेट्रो स्टेशनला मिळणार जलद कनेक्टिव्हिटी’; पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न!‘एनसीएमसी कार्ड अन् सायकल सुविधेला नागरिकांची पसंती’; गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी सुटणार मेट्रो!‘गणेश तलावाचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता टिकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार’; उपमहापौर शर्मिला बाबर!‘डेटा सेंटरमुळे परिसराचे तापमान ३ अंशांनी वाढण्याचा धोका’; पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘गणेश तलावाचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता टिकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार’; उपमहापौर शर्मिला बाबर!

‘गणेश तलावाचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता टिकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार’; उपमहापौर शर्मिला बाबर!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध उपाययोजनांची मागणी; पाण्याचे नमुने तपासण्याचे निर्देश देण्याची विनंती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: निगडी येथील प्रसिद्ध गणेश तलावात मोठ्या संख्येने कासव आणि मासे मृत अवस्थेत आढळल्याच्या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तलावाच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. या धक्कादायक घटनेची सखोल चौकशी करून तलावातील जलचरांचे संरक्षण आणि तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते प्रशांत शितोळे आणि नगरसदस्य शत्रुघ्न (बापू) काटे उपस्थित होते.

निगडी परिसरातील गणेश तलाव हा नागरिकांच्या विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र असून, परिसरातील पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेच्या दृष्टीने त्याला मोठे महत्त्व आहे. मात्र, तलावात कासव व मासे मृत आढळल्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी निवेदनात नमूद केले की, तलावातील पाण्याची खालावलेली गुणवत्ता, साचलेला गाळ आणि इतर संभाव्य कारणांची तांत्रिक तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. तलावातील पाण्याचे नमुने तात्काळ प्रयोगशाळेत तपासून जलचरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधावे.  तलावाच्या तळाशी साचलेला दूषित गाळ काढून संपूर्ण तलावाची स्वच्छता करावी.  तलावाच्या शाश्वत संवर्धनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा.  भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि आवश्यक देखभाल व्यवस्था उभी करावी.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा करताना उपमहापौर बाबर यांनी या विषयाकडे केवळ स्वच्छतेचा विषय म्हणून न पाहता, नैसर्गिक जैवविविधता व जलचरांचे रक्षण या व्यापक दृष्टिकोनातून पाहून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश देण्याची विनंती केली.
“शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि जलचरांचे अस्तित्व टिकवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गणेश तलावाचे मूळ नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समृद्धी जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.”
— शर्मिला बाबर (उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!