news
‘विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून वाचनाची कास धरत स्वच्छतादूत बनावे’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!‘शास्त्रीय गायन, व्यंगचित्र व रांगोळी स्पर्धेत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचे यश’; कलागुणांच्या जोरावर गाजवली आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा!‘विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल जग घडवावे’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला!‘शासकीय अनुदानाचे आमिष दाखवणाऱ्या बनावट लिंक्सपासून दूर राहा’; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन!‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!
Home पिंपरी चिंचवड ‘विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून वाचनाची कास धरत स्वच्छतादूत बनावे’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!

‘विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून वाचनाची कास धरत स्वच्छतादूत बनावे’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!

विद्यार्थ्यांना ‘शून्य कचरा किट’ व रिसायकल बॅगचे वाटप; पीएम श्री माध्यमिक शाळेतील अॅस्ट्रोनॉमी लॅब व रायफल शूटिंग केंद्राची पाहणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ उपक्रम शहराला शून्य कचऱ्याच्या दिशेने नेणारे महत्त्वाचे पाऊल: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: ‘शून्य कचरा’ संकल्पना म्हणजे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्या परिसरातून कचरा बाहेर जाणार नाही, अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करणे होय. शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे अचूक व्यवस्थापन शाळेतच करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा उपक्रम भविष्यात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर कचरामुक्त करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा ठाम विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ प्रकल्पाचा ufficial उद्घाटन सोहळा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या उद्घाटनाच्या विशेष सोहळ्यास स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समितीच्या सभापती रवीना आंगोळकर, शिक्षण समिती सदस्या तथा नगरसदस्या रिटा सानप, योगिता बारणे, नगरसदस्य तानाजी बारणे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका अर्चना कांडेकर, ज्योती तापकीर, शून्य कचरा शाळा मार्गदर्शक अर्चना मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
नगरसदस्या योगिता बारणे यांच्या विशेष पुढाकारातून थेरगाव शाळेत हा अभिनव शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाचा शुभारंभ झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘शून्य कचरा रिसायकल बॅग’ तसेच ‘शून्य कचरा किट’ चे वाटप करण्यात आले.

प्रकल्पाविषयी बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, “शाळेत निर्माण होणारा कचरा शाळेतच जिरवला पाहिजे, हा यामागचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत ‘शून्य कचरा मॉनिटर’ ही खास संकल्पना राबविण्यात येत आहे. शाळेत जो कचरा टाकेल, त्याला समजावून सांगणे आणि परिसर चकाचक ठेवण्याची जबाबदारी या मॉनिटरची असेल. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून थेरगाव शाळेत राबवला जात असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून तो इतर शाळांमध्येही विस्तारला जाईल. विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतच नव्हे, तर पालकांनाही या मोहिमेत जोडून घराघरांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा.”

या कार्यक्रमादरम्यान आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी एका आगळ्यावेगळ्या संवादशैलीची अनुभूती दिली. त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “या पुस्तकातील प्रत्येक विद्यार्थी हा स्वच्छतेचा खरा सुपरहिरो बनला पाहिजे. स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करा आणि संपूर्ण शहरात हा संदेश पसरवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय समजले, काय शिकायला मिळाले, हे मला नक्की फोन करून सांगा. तुमचा अनुभव मला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता पुस्तक वाचन, मैदानी खेळ आणि चांगल्या सवयींना आयुष्यात प्राधान्य दिले पाहिजे.”

उद्घाटन सोहळ्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी थेरगाव येथील ‘पीएम श्री माध्यमिक शाळेला’ सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. अॅस्ट्रोनॉमी लॅब आणि टिंकरिंग लॅब मधील उपक्रमांची माहिती घेतली. रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. शाळेच्या भिंतींवर विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या आकर्षक व सुंदर वारली चित्रांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!