news
‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!महात्मा फुले सृष्टी ‘ब्राँझ म्युरल्सचे तीन वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार’; पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचा मोठा निर्णय!‘डायल ११२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस राज्यात प्रथम; एआय तंत्रज्ञानाने तपासाला मिळणार गती’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव!‘ई-केवायसीच्या नावाने टाळाटाळ थांबवा अन् लाडक्या बहिणींचा निधी तात्काळ वर्ग करा’; कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा!‘वारकऱ्यांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध’; इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणावरून आळंदीकर आणि वारकरी आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड महात्मा फुले सृष्टी ‘ब्राँझ म्युरल्सचे तीन वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार’; पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचा मोठा निर्णय!

महात्मा फुले सृष्टी ‘ब्राँझ म्युरल्सचे तीन वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार’; पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचा मोठा निर्णय!

महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने प्रलंबित प्रश्न सुटला; १५,४६५ किलो ब्राँझ कलाकृतींचे काम वेगात होणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महात्मा फुले सृष्टीचे प्रलंबित काम अखेर मार्गी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘महात्मा फुले सृष्टी’ प्रकल्पातील गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले ब्राँझ म्युरल्स आणि कलाकृतींचे काम अखेर मार्गी लागले आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर धातूंच्या बाजारभावात झालेल्या प्रचंड वाढीमुळे हे काम थांबले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे व महापौर रवी लांडगे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला सकारात्मक मंजुरी दिली आहे.
प्रकल्प मार्गी लागल्याबद्दल बहुजन समाज, ओबीसी संघर्ष समिती आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे व महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे सन २०२१ मध्ये ‘Bronze / Gun Metal’ मध्ये म्युरल्स, पुतळे व कलाकृती तयार करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मूळ दरपत्रकानुसार ‘Bronze Mural’ चा दर १,५३,३३० रुपये प्रति चौ.मी. (जीएसटी, साचा बनविणे, मजुरी, वाहतूक व उभारणीसह) निश्चित करण्यात आला होता.
मात्र, निविदा मंजुरीनंतर जागतिक व युद्धासदृश परिस्थितीमुळे ब्राँझ आणि गन मेटलच्या बाजारभावात कमालीची वाढ झाली. मूळ निविदेतील दरात काम करणे कंत्राटदाराला आर्थिकदृष्ट्या अशक्य बनल्याने गेल्या ३ वर्षांपासून या कलाकृतींचे काम ठप्प पडले होते.

कामाची प्रगती थांबल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून बैठक घेण्यात आली. या कामासाठी पुनश्च नवीन निविदा काढली असती, तर महापालिकेचा वेळ, पैसा आणि कालावधी मोठ्या प्रमाणावर वाया गेला असता.
हे लक्षात घेऊन साचा बनविणे, कास्टिंग, मजुरी व वाहतूक या घटकांमधील दरात कोणतीही वाढ न देता, केवळ मेटलच्या मूळ दरातील आणि सध्याच्या दरातील फरकाची रक्कम मंजूर करण्याचा व्यावहारिक मार्ग महापालिका स्थायी समितीने स्वीकारला.  सन २०२१ मधील मूळ मेटल दर  ₹३७५ प्रति किलो, सध्याचा विचाराधीन मेटल दर  ₹१,१५० प्रति किलो , दरातील निव्वळ फरक  ₹७७५ प्रति किलो, एकूण आवश्यक Bronze / Gun Metal चे प्रमाण  १५,४६५ किलो , मंजूर फरकाची एकूण रक्कम  ₹१,१९,८९,३७५/- (१ कोटी १९ लाख ८९ हजार ३७५ रुपये)

 

मेटलच्या दरातील फरकापोटी १.१९ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी मिळाल्यामुळे आता कलाकाराला उर्वरित सर्व कलाकृती तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. महापालिकेने आखून दिलेल्या नवीन कालमर्यादेत ‘महात्मा फुले सृष्टी’चे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारा हा भव्य प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सामाजिक वर्तुळातून स्थायी समिती अध्यक्षांचे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!