news
‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!महात्मा फुले सृष्टी ‘ब्राँझ म्युरल्सचे तीन वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार’; पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचा मोठा निर्णय!‘डायल ११२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस राज्यात प्रथम; एआय तंत्रज्ञानाने तपासाला मिळणार गती’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव!‘ई-केवायसीच्या नावाने टाळाटाळ थांबवा अन् लाडक्या बहिणींचा निधी तात्काळ वर्ग करा’; कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा!‘वारकऱ्यांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध’; इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणावरून आळंदीकर आणि वारकरी आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!

‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कठोर आदेश; एसीबीच्या कारवाईनंतर १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे लाचलुचपत प्रकरणावरून सेवानिलंबित; १९ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य मुख्य कार्यालयात ‘मुख्य अभियंता-२’ या गट ‘अ’ पदावर कार्यरत असलेले प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईनंतर महापालिकेच्या प्रशासनाकडून अधिकृतपणे सेवानिलंबित (Suspended) करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे कठोर आदेश जारी केले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा, तसेच पर्यावरण (भामा आसखेड, आंध्रा प्रकल्प, पवना पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३) या महत्त्वाच्या विभागांचे कामकाज होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) यांचेकडील अहवालानुसार, पाणीपुरवठा विभागाच्या केबिनमध्ये करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान, तक्रारदाराच्या ३८ लाख रुपयांच्या टेंडरच्या फाईलवर सही करण्यासाठी प्रमोद ओभासे यांनी १९,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा (गु.र.न. ५७९/२०२६) दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना त्याच दिवशी सायंकाळी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दि. १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर लाचखोरीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली असून, हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग करणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार प्रमोद ओभासे यांना अटकेच्या दिनांकापासून (२९ ऑक्टोबर २०२६ पासून) सेवानिलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, स्थापत्य मुख्य कार्यालय’ हेच राहील आणि त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच नियमांनुसार त्यांना निर्वाह भत्ता (Subsistence Allowance) अदा करण्यात येईल.
संबंधित विभागाला आदेश देण्यात आले असून, पुढील १५ दिवसांत त्यांच्यावर दोषारोपपत्र (Charge Sheet) ठेवण्याच्या व विभागीय चौकशीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!