news
‘डायल ११२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस राज्यात प्रथम; एआय तंत्रज्ञानाने तपासाला मिळणार गती’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव!‘ई-केवायसीच्या नावाने टाळाटाळ थांबवा अन् लाडक्या बहिणींचा निधी तात्काळ वर्ग करा’; कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा!‘वारकऱ्यांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध’; इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणावरून आळंदीकर आणि वारकरी आक्रमक!‘अशा हुकूमशाही कारभाराने लोकहिताचा आवाज दबणार नाही’; मारुती भापकर यांचा पोलीस प्रशासन व राज्य सरकारवर घणाघात!‘एमबीएच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’; पिंपरीच्या SBPIM मध्ये दिवाळी मंडई उद्योजक स्पर्धा संपन्न!
Home पिंपरी चिंचवड ‘डायल ११२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस राज्यात प्रथम; एआय तंत्रज्ञानाने तपासाला मिळणार गती’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव!

‘डायल ११२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस राज्यात प्रथम; एआय तंत्रज्ञानाने तपासाला मिळणार गती’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या आधुनिक प्रकल्पांचा शुभारंभ; दुष्काळग्रस्तांसाठी पोलिसांचा मदतीचा हात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाने सज्ज राहावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी सामाजिक उपक्रम आणि वेगवान तपासाच्या जोरावर पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने गुन्हे नियंत्रणात उत्तम कामगिरी केली आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवडचा होणारा भौगोलिक व लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेता, पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे नियंत्रणाच्या प्रत्येक आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, युवाशक्तीला योग्य दिशा आणि ऊर्जा देण्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पिंपरी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
या भव्य कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशापुढील सर्वात मोठे आव्हान असलेल्या अंमली पदार्थांच्या (Drugs) समस्येवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “युवा पिढीची बौद्धिक व शारीरिक क्षमता नष्ट करण्यासाठी आणि देशाची प्रगती रोखण्यासाठी षड्यंत्राचा भाग म्हणून ड्रग्सचा शिरकाव केला जातो. याला आळा घालण्यासाठी पुढील ३ ते ४ वर्षांत देश पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. यात प्रत्येकाने सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.” व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार, लोकजागृती आणि वितरण साखळी मोडीत काढण्यासाठी यंत्रणा कसून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या राहणीमानाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडसाठी अतिशय आधुनिक पोलीस मुख्यालय उभारले जात आहे. दिवंगत अजिंत पवार यांनी स्वतः लक्ष घालून या इमारतीची रचना तयार करून घेतली होती. आयुक्तालयाची ही इमारत पूर्ण झाल्यावर देशातील सर्वात आधुनिक पोलीस मुख्यालय ठरेल. तसेच पोलिसांसाठी पारंपरिक निवासस्थानांची संकल्पना बदलून सर्व सोयीसुविधांनी युक्त आणि सन्मानाने जगता येईल अशी घरे तयार करण्यात येत आहेत.

डायल ११२ या आपत्कालीन यंत्रणेमुळे पोलिसांच्या पोहचण्याची वेळ अवघ्या ३ मिनिटांवर आली असून, पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय याबाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.  गुन्ह्यांचा तपास गतिमान करण्यासाठी एआय आधारित ‘तपास सारथी’ उपक्रमाद्वारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित तपास व आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.  पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, ४ ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे वाहतूक नियमन आणि गुन्हे तपासात मोठी मदत होईल.

 

जनतेला न्याय देण्यासाठी पोलिसांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलेला १ कोटी रुपयांचा निधी त्यांची संवेदनशीलता दर्शवतो. शहराचा कायापालट करण्यात दिवंगत अजित पवार यांचे योगदान अमूल्य आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चिखलीमध्ये पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत, पिंपरी पोलीस संकुल, आळंदीत पोलीस ठाणे, वाकड येथे अपर पोलीस आयुक्त कार्यालय आणि सायबर कार्यालयामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची पायाभूत सुविधा मजबूत झाली आहे. ‘दिशा’ आणि ‘ज्येष्ठानुबंध’ यांसारखे उपक्रम कौतुकास्पद आहेत. – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील प्रकल्पांचा शुभारंभ व लोकापर्ण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथील जागेच्या ७/१२ उताऱ्याचे औपचारिक हस्तांतरण. सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही व एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) प्रकल्पाचा शुभारंभ. पिंपरी पोलीस ठाणे, परिमंडळ-१ कार्यालय, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कार्यालय आणि २०० शासकीय निवासस्थानांचा समावेश असलेल्या ‘पिंपरी पोलीस संकुलाचे’ भूमिपूजन. ‘नशामुक्त पिंपरी-चिंचवड’ अभियानाचा अधिकृत शुभारंभ. पोलीस दलातर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द करण्यात आला.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!