21

प्रा. रुपाली पाटील यांना भारती विद्यापीठाकडून पीएचडी (Ph.D.) पदवी प्राप्त!
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या प्राध्यापिका रुपाली पाटील यांना नुकतीच ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (पीएचडी) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. रुपाली पाटील यांनी “आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी – पश्चिम महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातील समस्या आणि आव्हाने” या अत्यंत महत्त्वपूर्ण व सामाजिक दृष्टीने संवेदनशील विषयावर आपला सखोल संशोधन प्रबंध सादर केला होता.
त्यांच्या या प्रदीर्घ संशोधनासाठी भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. जयश्री खंदारे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
याशिवाय या संशोधन प्रवासात भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज पुणेचे प्राचार्य, न्यू लॉ कॉलेज सांगलीच्या प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर तसेच यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ. सतीश माने यांचे विशेष सहकार्य लाभले.
पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळात कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या प्रशासकीय, कायदेशीर समस्या व आव्हानांवर त्यांनी आपल्या संशोधनातून प्रकाश टाकला आहे. प्रा. रुपाली पाटील यांच्या या यशाबद्दल विधी क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
