news
Home पिंपरी चिंचवड ‘ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ’; दिवाळी फराळ उपक्रमाचे पिंपरी-चिंचवड शहरात कौतुक!

‘ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ’; दिवाळी फराळ उपक्रमाचे पिंपरी-चिंचवड शहरात कौतुक!

विजय शिनकर, ईश्वरलाल चौधरी व अरुण बागडे यांच्यासह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग; ज्येष्ठ नागरिकांनी मानले आभार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड शहराचा स्तुत्य उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: आत्मीयता आणि प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीच्या आनंददायी पर्वाचे औचित्य साधून ‘ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिंपरी-चिंचवड’ शहराच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत दिवाळी फराळाचे अत्यंत आपुलकीने वाटप करण्यात आले. दिवाळीचा गोडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि विशेषतः समाजाचे आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उदात्त सामाजिक हेतूने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याला पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास माधवबागचे संचालक तुषार पाटील, महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, कार्याध्यक्ष विजय शिनकर, सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, सहसरचिटणीस एकनाथ धुळे, कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे, स्थायी सदस्य व प्रवक्ते अरुण बागडे, स्थायी सदस्य खंडू बिरदवडे यांच्यासह विभागीय उपाध्यक्ष, विभागीय सचिव, सहसचिव आणि महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ म्हणाल्या की, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या अखंड समाजाचे खरे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. सणासुदीच्या दिवसांत त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. फराळ वाटपानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे तृप्त हास्य हीच आमच्या या सामाजिक उपक्रमाची खरी पावती आहे.”

दिवाळीचा खमंग फराळ स्वीकारल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत महासंघाच्या या संवेदनशील उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा, आपलेपणा आणि बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते. दिवाळीच्या काळात आपुलकीने मिळालेली ही भेट आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरली आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांचा योग्य सन्मान राखण्यासाठी महासंघाने राबविलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!