19

पीसीसीओईला ‘जल्लोष २०२६’ सांस्कृतिक स्पर्धेत तीन पारितोषिके प्राप्त!
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे ‘कॉलेज ऑफ एज्युकेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जल्लोष २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (PCCoE) तीन विविध कलाप्रकारांत पारितोषिके पटकावत दणदणीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजयी तिन्ही विद्यार्थ्यांची आगामी राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भारतीय शास्त्रीय गायन स्पर्धा सानिया मुंगारे (प्रथम क्रमांक), व्यंगचित्र (Cartooning) स्पर्धा जयदीप वाकडे (द्वितीय क्रमांक), रांगोळी स्पर्धा चंचल वर्मा (तृतीय क्रमांक) विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे कौतुक करत त्यांना राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी संस्थेकडून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, अधिव्याख्याते डॉ. पद्माकर देशमुख आणि उपअधिव्याख्याते डॉ. राजेश फुरसुले यांनी पीसीसीओईच्या ‘आर्ट सर्कल’ संघाचे, विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. मसनाजी नुकुलवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
