news
‘विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून वाचनाची कास धरत स्वच्छतादूत बनावे’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!‘शास्त्रीय गायन, व्यंगचित्र व रांगोळी स्पर्धेत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचे यश’; कलागुणांच्या जोरावर गाजवली आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा!‘विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल जग घडवावे’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला!‘शासकीय अनुदानाचे आमिष दाखवणाऱ्या बनावट लिंक्सपासून दूर राहा’; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन!‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!
Home पिंपरी चिंचवड ‘विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल जग घडवावे’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला!

‘विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल जग घडवावे’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला!

'हॅक टुडे अ सेफर टुमारो' संकल्पनेवर १६०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग; भारत, युके, युएसए व दुबईतील हॅकर्सचा ऑनलाईन व ऑफलाईन जलवा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक झाले पाहिजे: जसविंदर सिंह

पिंपरी-चिंचवड / साते प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: डिजिटल युगात सायबर सुरक्षेतील वाढते धोके आणि त्यावरील उपाययोजनांबाबत समाजाने अत्यंत जागरूक झाले पाहिजे. सायबर सुरक्षेसाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून त्याची योग्य अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन क्विक हिल (Quick Heal) आणि सिक्रीट लॅबचे वरिष्ठ संचालक जसविंदर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते-वडगाव (मावळ) येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (PCU) ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स’च्या वतीने ‘क्रेस्ट सीटीएफ २.०-२०२६’ (Crest CTF 2.0 – 2026) या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘हॅक टुडे अ सेफर टुमारो’ (Hack Today A Safer Tomorrow) या संकल्पनेवर आधारित या ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धेत भारत, दुबई, पाकिस्तान, युके आणि युएसए मधील तब्बल १६०० हून अधिक स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या स्पर्धेचे आयोजन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मार्गदर्शन करताना पीसीयूच्या ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स’चे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी कुशल सायबर सुरक्षा तज्ज्ञ होण्यासाठी सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान शिकले पाहिजे. तसेच एथिकल हॅकिंगच्या (Ethical Hacking) माध्यमातून सुरक्षित डिजिटल जगाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले पाहिजे.”
या सोहळ्यास पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संरक्षण प्रकल्पांचे तज्ज्ञ लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, सायबर सिक्युअर्ड इंडियाचे संस्थापक निखिल महादेश्वर, पीसीयू कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, परीक्षा नियंत्रक डॉ. अंजू बाला, अमित पाटील, शैक्षणिक विभाग अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, आयक्यूएसएसचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, हायरॉशील्डचे संस्थापक प्रियांशु कुक्कर, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीच्या संचालक शिफा सायकलवाला आणि संस्थापक संचालक रोहित गौतम आदी उपस्थित होते. उपस्थितांनी सायबर क्षेत्रातील नवनवीन आव्हानांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सीटीएफ ७ (CTF 7), थंडरसिफेर, झेड ७ सिक्युरिटी सोल्युशन्स, व्हाईटएरो, एनवायएक्स, हिरो शील्ड, सिक्युरिटी बोट आणि टीसेकफोर्ज यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार बानुबा कोडे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!