news
Home पिंपरी चिंचवड ‘अभ्यासक्रमासोबतच तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची’; पीसीटीच्या PCCOER मध्ये विद्यार्थ्यांचा भव्य पोस्टर प्रेझेंटेशन सोहळा!

‘अभ्यासक्रमासोबतच तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची’; पीसीटीच्या PCCOER मध्ये विद्यार्थ्यांचा भव्य पोस्टर प्रेझेंटेशन सोहळा!

१०० हून अधिक प्रकल्प संघांची सहभाग नोंदणी; संचालक डॉ. हरीश तिवारी व पीसीईटी (PCET) विश्वस्तांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थ्यांनी उद्योग व समाजाच्या गरजा ओळखून कौशल्ये अद्ययावत करावीत: श्रवण पाटील

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अथवा शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता उद्योग क्षेत्र आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आपली कौशल्ये अद्ययावत केली पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्ये आणि नव-नवीन समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचा उद्देश ‘आविष्कार’सारख्या स्पर्धांमधून यशस्वीपणे साध्य होत असल्याचे प्रतिपादन महिंद्रा समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रवण पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER) येथे ‘आंतरिक गुणवत्ता नोंदणी कक्ष’ (IQAC) आणि ‘संशोधन व विकास’ (R&D) विभागाच्या संयुक्त विद्यमाने “आविष्कार २०२६-२७” या संस्थास्तरीय प्रकल्प स्पर्धेतील पोस्टर प्रेझेंटेशनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रवण पाटील बोलत होते.

या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी शाखांमधील १०० हून अधिक प्रकल्प संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समस्या, औद्योगिक गरजा आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी उपायांवर आधारित आपले संशोधन पोस्टरच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे संचालक डॉ. हरीश तिवारी म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी सातत्याने अशा संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर घातली पाहिजे.” तसेच आर. अँड डी. अधिष्ठाता डॉ. सुदर्शन बोबडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आयक्यूएसीचे अधिष्ठाता व उपसंचालक डॉ. राहुल मापारी आणि समन्वयक डॉ. सुखदीप चौगुले यांनी मोलाचे योगदान दिले.

स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!