news
Home पिंपरी चिंचवड ‘साहिल वाकोडेच्या कुटुंबीयांना न्याय द्या अन् दोषींवर कठोर कारवाई करा’; निगडीत भीमशक्ती संघटना आक्रमक!

‘साहिल वाकोडेच्या कुटुंबीयांना न्याय द्या अन् दोषींवर कठोर कारवाई करा’; निगडीत भीमशक्ती संघटना आक्रमक!

उच्च शिक्षण संस्थांमध्ये पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; भीमशक्ती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथील विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि तातडीने चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटना (पिंपरी-चिंचवड शहर) च्या वतीने निगडी येथील तहसील कार्यालयात मा. तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदनाद्वारे एल्गार पुकारण्यात आला.
साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी संस्थात्मक छळ, मानसिक त्रास, जातीय भेदभाव आणि अपमानास्पद वागणुकीबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणातील तक्रारी, एफआयआर (FIR), उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच आयआयटी प्रशासनातील नोंदींची सखोल तपासणी करून सत्य समोर आणावे, अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

तपासामध्ये कोणत्याही व्यक्तीविरुद्ध ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही राजकीय वा प्रशासकीय दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा जातीय भेदभाव, मानसिक व संस्थात्मक छळ रोखण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष सुरज चंद्रकांत गायकवाड, युवक शहराध्यक्ष अक्षय श्रीमंत कसबे, युवती अध्यक्षा प्रतिभाताई बनसोडे, प्रीतीताई गोडांबे, पिंपरी लिंक रोड शाखा अध्यक्ष किसन तिगोटे, मुकेश गायकवाड, संपर्क प्रमुख लक्ष्मण साळुंखे, उपाध्यक्ष सुनील ससाणे, उपाध्यक्ष वैशाली आठवले यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“साहिल वाकोडे याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, ही भीमशक्ती सामाजिक संघटनेची ठाम भूमिका आहे.”
— सुरज गायकवाड (शहराध्यक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटना, पिंपरी-चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!