news
Home पिंपरी चिंचवड ‘निवडणूक आयोगातील गलथान कारभाराने लोकशाहीवर घाला’; काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांचे तीव्र आंदोलन!

‘निवडणूक आयोगातील गलथान कारभाराने लोकशाहीवर घाला’; काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांचे तीव्र आंदोलन!

अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन सादर; ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करण्याची काँग्रेसची जोरदार मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘मतचोरीच्या देशद्रोहाविरोधात काँग्रेसचा एल्गार’; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची व बडतर्फीची मागणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: केंद्रीय निवडणूक आयोगातील भाजपधार्जिणे धोरण आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर ‘मतचोरी व देशद्रोहाविरोधात निषेध आंदोलन’ करण्यात आले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरून बडतर्फ करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करत काँग्रेसने निगडी येथे तीव्र निदर्शने केली. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सोपवले.

आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगातील गलथान, अनाधिकृत आणि पारदर्शकतेचा अभाव असलेल्या कारभाराने लोकशाहीवर मोठा घाला घातला आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर तब्बल १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवले असल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून समोर आले आहे.
हे आक्षेप मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्परीक्षण (SIR), मतदारांची अनधिकृतपणे नावे नोंदवणे व वगळणे, तसेच आयोगाच्या आयटी (IT) प्रणालीचे केंद्रीयकरण करण्याबाबत होते. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने पुराव्यानिशी निवडणूक आयोगाची पोलखोल केली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “भाजपधार्जिण्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करून अटक करण्यात यावी. लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या स्तंभाला मोडकळीस आणणाऱ्या या धोरणाविरोधात संशोधक पत्रकारांनी आणि नेते राहुलजी गांधी यांनी केलेले आरोप तंतोतंत खरे ठरले आहेत. भाजपने मागील निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला सोबत धरून घोटाळे करत निकाल बदलले हे आता स्पष्ट झाले आहे. याविरोधात आता जनता रस्त्यावर उतरेल आणि भाजपचा अंत जवळ आला आहे.”

या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, विचार विभागाचे युवक प्रदेशाध्यक्ष राहुल शिंपले, भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, शहर उपाध्यक्ष सोपानराव माने, रवी भोसकर, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, स्वाती शिंदे, अश्विनी पाटील, गौरी नरसिंगे, आशा भोसले, रितिका शर्मा, हरीश डोळस, हिराचंद जाधव, सूरज माने, देवदत्त रानवडे, महबूब इनामदार, दिग्विजय मोहिते, नबीलाल मुल्ला, विल्यम साळवी, प्रदीप शर्मा, कबीर मोहम्मद, पुरुषोत्तम राऊत, नितीन सोनवणे, गौतम सरपाते, डेनिस देवनसन, अमरसिंग पोथिवाल, फिरोज तांबोळी, भास्कर नारखेडे, गुंगा क्षीरसागर, संगमेश्वर गंगापुरे, कृष्णा जाधव, संदेश जगताप, रामकिसन माने, राजू भाई परदेशी, जितेंद्र छाबडा, दीपक जाधव, प्रवीण कांबळे, आलोक लाड, अशोक गायकवाड आदींसह काँग्रेस व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!