22
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृतींना रक्तदानातून अभिवादन; थेरगावात रक्तदान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील निलंगेकर व रविकिरण घटकार यांच्या संयुक्त विद्यमाने थेरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ९० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांनी आणि युवकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबिराच्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठवाड्याच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि यशाची ऐतिहासिक गाथा मांडण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
या सोहळ्याला ग्लोबल मराठा एक्सपोचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अर्जुन खामकर, व्यावसायिक दिलीप कुलकर्णी, पवार साहेब, जय हनुमान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय गायके, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, शिवसेना नेते हरेश नखाते, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, शिवसेना महिला आघाडी संघटिका अनिताताई पांचाळ, पिंपरी-चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, समन्वयक श्रीमंत गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निखिल साकळे, छावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादाभाऊ पाटील, छावा मराठा महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई पाटील, युवा नेते हनुमं पिसाळ, उद्योजक नवनाथ जाधव, अक्षय घटकार, चंद्रकांत उंबरे, कामगार नेते परमेश्वर कुंभार, प्रा. शैलेश झरकर, आशिष पाटील, महाराष्ट्र आयटी सेनेचे अनिल ओझा आणि प्रकाश महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक गोरख पाटील निलंगेकर व रविकिरण घटकार यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान रक्तसंकलनाचे महत्त्वाचे कार्य पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने पार पाडले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
