news
‘वेळेत कर भरा अन् जप्तीची कारवाई टाळा’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना कडक इशारा!‘राष्ट्र प्रथम भावनेने कामगारांच्या हक्कासाठी लढा’; चिंचवडमधील मेळाव्यात युवा नेते अनुप मोरे यांचे आक्रमक प्रतिपादन!पीसीईटीच्या एसबीपीसीओएडी महाविद्यालयात ४३ गुणवंत अन् माजी विद्यार्थ्यांचा सन्मान; नूतन विद्यार्थी परिषदही जाहीर!‘बोगस उपसूचना घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घालू नका’; मारुती भापकर यांचे स्थायी समिती सभापती बारणे व आयुक्तांना पत्र!पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नवा चेहरा; देवेंद्र तायडे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा!
Home पिंपरी चिंचवड ‘वेळेत कर भरा अन् जप्तीची कारवाई टाळा’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना कडक इशारा!

‘वेळेत कर भरा अन् जप्तीची कारवाई टाळा’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना कडक इशारा!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व उपायुक्त सचिन पवार यांचे आवाहन; ५० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी घेतला सवलतीचा लाभ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ऑनलाइन मालमत्ता कर भरून ४ टक्के सवलत मिळवण्याचा आज शेवटचा दिवस; थकीत करासाठी जप्तीची कारवाई तीव्र होणार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीसाठी मालमत्ताधारकांना दिल्या जाणाऱ्या ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याचा आज, बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी शेवटचा दिवस आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ४ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबरनंतर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडून जप्तीची मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात कर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कडक कारवाई केली जाणार असल्याने थकबाकीदारांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी थकीत कर तात्काळ भरावा, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

१ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४ टक्के ऑनलाइन सवलतीचा यशस्वीरीत्या लाभ घेतला आहे. ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे.  १ एप्रिल २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील ४ लाखांहून अधिक नागरिकांनी तब्बल ६०१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरून महापालिकेच्या तिजोरीत मोलाचा वाटा उचलला आहे.

 

“मालमत्ता कर हा शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कराचा भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. वेळेत कर भरल्यास महापालिकेला पायाभूत सुविधा आणि नागरी सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे शक्य होते.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“थकबाकीदार नागरिकांनी जप्तीच्या कारवाईची प्रतीक्षा न करता ३० सप्टेंबरपूर्वी थकीत कराचा भरणा करावा. ३० सप्टेंबरनंतर थकीत औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र आणि इतर मालमत्तांवर कडक जप्तीची कारवाई केली जाईल. तसेच चालू कराचा ऑनलाइन भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.”
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!