news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड ‘स्वीकार, समाधान अन् संयम…’; प्रा. पद्माकर पुंडे यांनी सांगवीत मांडली आनंदी जीवनाची ‘पंचसूत्री’!

‘स्वीकार, समाधान अन् संयम…’; प्रा. पद्माकर पुंडे यांनी सांगवीत मांडली आनंदी जीवनाची ‘पंचसूत्री’!

सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन; ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करत फाउंटन पेन भेट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ज्येष्ठांनी सायबर गुन्हेगारीपासून सावध राहावे: सांगवीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न!

सांगवी प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून यश ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रमणीनगर, सांगवी यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सांगवीच्या नगरसेविका तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्तीताई कांबळे आणि माजी नगरसेवक संतोष कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले, तर प्रा. पद्माकर पुंडे यांनी आनंदी जीवनाची पंचसूत्री मांडली.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे विभागातील पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस यांनी सायबर धोके, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित डिजिटल बँकिंग व्यवहार, वैयक्तिक व आर्थिक माहितीची सुरक्षितता तसेच ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस फौजदार राजाराम शेळके यांनी सांगितले की, “सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. वेळीच तक्रार नोंदवल्यास फसवणूक झालेली रक्कम ब्लॉक करणे व पुढील कारवाई करणे सुलभ होते.”

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष व प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी ‘आनंदी जीवनाची पंचसूत्री’ या विषयावर व्याख्यान दिले. सांगवीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. प्रा. पुंडे यांनी ज्येष्ठांना तणावमुक्त व आनंदी जगण्यासाठी खालील पाच सूत्रे सांगितली- १. आपल्याला जीवनात जे मिळाले आहे, त्याचा सहज स्वीकार करावा. २. प्रत्येक परिस्थितीत माणसाने समाधानी राहावे. ३.  आयुष्यात आवश्यक तिथे तडजोड करायला शिकावे. ४.  नात्यांमध्ये व समाजात सहनशीलता बाळगावी. ५.  कठीण प्रसंगात जीवनात संयम ठेवण्यास शिकावे.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सभासद विष्णू पगारे, टेकाडे, पाटील आणि विजय सोनवणे यांचे केक कापून वाढदिवस उत्साहात साजरे करण्यात आले. त्यांना आठवण म्हणून फाउंटन पेन भेट देण्यात आले. या सोहळ्याला संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, उपाध्यक्ष त्रिंबक देशमुख, कार्याध्यक्ष सूर्यकांत वराडकर, सचिव बाळासाहेब सोनावणे, खजिनदार दयानेश्वर शिंगाडे यांच्यासह ६० ते ७० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बाळासाहेब सोनवणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रकाश भालेराव यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपाहार व चहाचे वितरण करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!