news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९ कर्मचारी नियत वयोमानानुसार तर २ जण स्वेच्छानिवृत्त; सपत्नीक करण्यात आला गौरव!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९ कर्मचारी नियत वयोमानानुसार तर २ जण स्वेच्छानिवृत्त; सपत्नीक करण्यात आला गौरव!

मधुकर पवळे सभागृहात २१ कर्मचाऱ्यांचा भावूक वातावरणात सपत्नीक सत्कार; पुढील वाटचालीस महापालिकेकडून शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे सप्टेंबर २०२६ अखेर २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने शहराची अविरत सेवा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आज एका भक्कम पायावर उभी आहे,” अशा शब्दांत महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित सोहळ्यात सप्टेंबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १९ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले २, अशा एकूण २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सपत्नीक भावूक वातावरणात सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे, नंदकुमार इंदलकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले (१९ कर्मचारी) उपअभियंता गणेश राऊत, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, मुख्याध्यापक पुष्पा शिंदे, रजनी आहेर, अनुजा सोनगरे, मुख्य लिपिक रामू गेंगजे, रोहिणी ढेंबरे, सिस्टर इनचार्ज पौर्णिमा आमले, जलधारा टिपले, कॉम्प्युटर ऑपरेटर अरुण गुंडगळ, उपशिक्षक नीलिमा भांबेरे, सुनिता शेजवळ, रखवालदार बाळू लांडगे, लिफ्टमन विलास गायकवाड, मजूर हंसराज सजनियाल, लक्ष्मण मानमोडे, पांडुरंग गवारी, सफाई कामगार सविता काळभोर, नंदकुमार भोंडवे 
स्वेच्छानिवृत्ती घेतलेले (२ कर्मचारी) सफाई कामगार राजेश गंगावणे, कचरा कुली गणेश यादव

 

दीर्घकाळ पालिकेत सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रती या कार्यक्रमात महापालिका प्रशासनाच्या वतीने मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील निरोगी, दीर्घायुषी आणि समृद्ध निवृत्त आयुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!