news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड ‘खाकीचा धडाका’; तरुणवर गळ्यावर वार करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या महाळुंगे पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आवळल्या मुसक्या!

‘खाकीचा धडाका’; तरुणवर गळ्यावर वार करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या महाळुंगे पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आवळल्या मुसक्या!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई; एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या ४ तासांत बेड्या!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

तळेगाव दाभाडे: उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत तत्परता दाखवत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अवघ्या ४ तासांच्या आत अटक केली आहे. पारंपारिक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असून, यामुळे एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या कारवाईचे मोठे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास महाळुंगे स्मशानभूमीजवळ, जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. राहुल शामकुमार निषाद (वय २३ वर्षे, रा. महालुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) या तरुणाला आरोपी १) ओम चंद्रकांत बहादुरे आणि २) अनिल रामराव आघाडे यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अडवले. आरोपींनी राहुल यांच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणी पीडित राहुल निषाद यांच्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. आरोपी गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे त्यांचा मागोवा घेतला. पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून अवघ्या ४ तासांच्या आत त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

सदर कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली यांच्या सूचनांनुसार पार पडली. तसेच पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (महाळुंगे विभाग) प्रिया डमाळे, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, पोलीस शिपाई बापूराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे आणि समीर महात यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!