news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड ‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!

‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!

संचालक डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते इंडक्शन प्रोग्राम संपन्न; पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संवेदनशील कुशल अभियंता अशी प्रतिमा तयार करा: डॉ. हरीश तिवारी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत: अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करीत असताना समाजामध्ये जबाबदार, संवेदनशील आणि कुशल अभियंता अशी आपली प्रतिमा तयार करावी. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना आणि उद्योग संपर्क यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER) चे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयात मेकॅनिकल, सिव्हिल, इ अँड टीसी (E&TC) आणि आयटी (IT) या विभागांच्या प्रथम वर्ष बी. टेक. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. तिवारी बोलत होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, नैतिक मूल्ये आणि सातत्याचे आचरण करून ज्ञानार्जन व तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा. सध्या तंत्रज्ञान विकासाचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या अभियंत्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा.”
तसेच पालक प्रतिनिधी अशोक अरळी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणाऱ्या प्रयत्नांचे आणि उपलब्ध संधींचे भरभरून कौतुक केले.

या प्रसंगी मेकॅनिकल, सिव्हिल, इ अँड टीसी आणि आयटी या चारही शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास असोसिएट डीन डॉ. राहुल मापारी, विभाग प्रमुख प्रा. शीतल पाटील, इंडक्शन प्रोग्राम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रिया ओघे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!