news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home मुख्यपृष्ठ ‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!

‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!

सौदी अरेबियात विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग; स्वास्तिक हाइट्स सोसायटीत 'सच्च्या हीरो'च्या भव्य स्वागताची तयारी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

३३ हजार फूट उंचीवर प्राणाची बाजी लावणारे फ्लाईदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार बनले ‘रियल हीरो’; मुंबईत झळकले पोस्टर्स, जगभरात कौतुकाचा वर्षाव!

मुंबई विशेष प्रतिनिधी, दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: फ्लाईदुबईचे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी ३३ हजार फूट उंचीवर निर्माण झालेल्या भीषण आणि प्राणघातक प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखवत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. कॉकपिटमध्ये ओमानच्या सह-पायलटने अचानक चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ झालेले असतानाही कॅप्टन स्मित यांनी विमानावरील नियंत्रण सुटू दिले नाही. त्यांच्या या धाडसाची आणि शौर्याची चर्चा आता केवळ देशातच नव्हे तर जगभरात होत आहे.
सध्या त्यांच्यावर सौदी अरेबियातील तबुक येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आणि स्वास्तिक हाइट्स सोसायटीत त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स झळकले आहेत.

बुधवारी फ्लाईदुबईचे विमान ‘FZ1073’ हे १३७ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांसह दुबईहून तेल अवीवच्या दिशेने उड्डाण करत होते. विमानाची कमान भारतीय कॅप्टन स्मित मच्छार आणि ओमानचे सह-पायलट यांच्याकडे होती. उड्डाणानंतर विमान सुमारे ३३ हजार फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमध्ये ओमानच्या सह-पायलटने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने अनेक वार केले. स्मित गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले; तरीही त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ३ ते ४ मिनिटे लढा देत सह-पायलटला मुख्य नियंत्रणापासून दूर ठेवले. या संघर्षादरम्यान विमान अवघ्या ३० सेकंदात ३३ हजार फुटांवरून १७ हजार फुटांपर्यंत खाली आले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) तातडीने संदेश देण्यासाठी ट्रान्सपाँडरवरून आधी ‘७७००’ (गंभीर आपत्कालीन स्थिती) आणि त्यानंतर ‘७५००’ (हायजॅक किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप) हे स्क्वॉक कोड पाठवण्यात आले.  कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि कॉकपिटमधील प्रतिकारामुळे विमानाचे सौदी अरेबियामध्ये सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग शक्य झाले.

 

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या या ऐतिहासिक शौर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांच्या असीम धाडसाची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मित मच्छार यांना ‘सच्चा हीरो’ संबोधत ते लवकरात लवकर पूर्णपणे स्वस्थ व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. ज्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून स्मित यांनी २००७-०८ मध्ये ऑनलाईन मॅनेजमेंटची पदवी घेतली होती, त्या संस्थेनेही आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त केला आहे.

 

स्मित मच्छार यांच्या धाडसाची बातमी समजताच मुंबईतील त्यांच्या स्वास्तिक हाइट्स सोसायटीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. स्थानिक भाजप नगरसेविका सुषम सावंत यांनी स्मित यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
सोसायटीचे अध्यक्ष अशोक मपारा, स्मित यांच्या वडिलांचे मित्र लक्ष्मीकांत जोशी, बालपणीचा मित्र प्रतीक गांधी आणि शेजारी अक्षय दोशी यांनी कठीण प्रसंगात मच्छार कुटुंबाला विमानतळावर पोहोचवण्यासाठी आणि इतर कामांत सहकार्य केले. स्मित सौदी अरेबियातून पूर्णपणे बरे होऊन मुंबईत परतल्यानंतर त्यांचे भव्य आणि ऐतिहासिक स्वागत करण्याची तयारी सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे.

कॅप्टन स्मित मच्छार यांना व्यावसायिक विमान उड्डाणाचा १३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी २०११ मध्ये आपली पहिली उड्डाण सेवा बंगळुरु ते दिल्ली अशी सुरू केली होती. बोइंग ७३७ फ्लीटवर त्यांच्या नावावर तब्बल ९,७५० तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. जून २०२२ पासून ते फ्लाईदुबईच्या बोइंग ७३७ ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत.
सध्या सौदी अरेबियातील भारतीय अधिकारी तेथील प्रशासनाच्या आणि स्मित यांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण देश सध्या या ‘रियल हीरो’च्या लवकरात लवकर बरे होऊन मायदेशी परतण्याची वाट पाहत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!